New Rules: आजपासून बदलणार `हे` 10 नियम, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Pravin Dabholkar Mon, 01 Jul 2024-7:00 am,

New Rules from Jully: आजपासून जुलै महिना सुरु झालाय. या महिन्यात तुमच्या जिवनाशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. हे बदललेले नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. कारण याचा थेट परिणाम तुमच्या खर्चाशी जोडला गेलाय.  मोबाईल टॅरिफ रेटपासून बँक क्रेडिट कार्डपर्यंत बदललेले असे 10 नियम जाणून घेऊया.

जिओ 3 जुलैपासून मोबाईल सेवांचे दर वाढवणार आहे. तुमचा रिचार्ज 12 ते 27 टक्क्यांनी वाढवणार आहे. जवळपास अडीच वर्षांच्या कालावधीनंतर जिओ पहिल्यांदाच मोबाईल सर्व्हिसचे दर वाढवतंय. जिओच्या सर्वात कमी रिचार्जची किंमत वाढवून आता 19 रुपये असून यात 1 जीबी डेटा ‘ॲड-ऑन-पॅक’ पॅक आहे, ज्याची किंमत 15 रुपयांपेक्षा 24 टक्के जास्त आहे. 

जिओ पाठोपाठ आता एअरटेलनेदेखील युजर्सना धक्का दिलाय. भारती एअरटेल 3 जुलैपासून मोबाइल दरांमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. अमर्यादित व्हॉइस प्लॅनमध्ये कंपनीने 179 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 199 रुपये, 455 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 599 रुपये आणि 1,799 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 1,999 रुपयांपर्यंत वाढवली आहे. पोस्टपेड प्लॅनसाठी, 399 रुपयांचा टॅरिफ प्लॅन आता 449 रुपयांचा असेल. त्याच वेळी, 499 रुपयांचा प्लॅन आता 549 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. सध्याच्या 599 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत 699 रुपये असेल आणि 999 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता 1199 रुपये असेल.

तोट्यात चाललेली दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडियाने 4 जुलैपासून मोबाइल दरात 11-24 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 28 दिवसांच्या मोबाईल सेवेसाठी एंट्री लेव्हल प्लॅन, किमान रिचार्ज किंमत 179 रुपयांवरून 199 रुपयांपर्यंत सुमारे 11 टक्क्यांनी वाढवली आहे. Vodafone Idea ने 1.5 GB डेटा प्रतिदिन असलेल्या आपल्या लोकप्रिय 84-दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची ​​किंमत 719 रुपयांवरून 859 रुपये केली आहे. 

मोबाइल सिम बदलल्यास 7 दिवसांनंतरच मोबाइल क्रमांक 'पोर्टिंग' होऊ शकतो. मोबाईल फोन नंबरद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी 'सिम स्वॅप' केल्यानंतर 10 दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. पण दूरसंचार नियामकाने हा कालावधी सात दिवसांवर आणला आहे. 

1 जुलैपासून नॅशनल पेन्शन सिस्टम इन्व्हेस्टर्सना त्याच दिवसाच्या सेटलमेंटला परवानगी दिली आहे. कोणत्याही सेटलमेंटच्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत ट्रस्टी बँकेला मिळालेले नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) योगदान त्याच दिवशी गुंतवले जाईल .त्याच दिवशी ग्राहकांना NAV (नेट ॲसेट व्हॅल्यू) चा लाभ मिळणार आहे. आत्तापर्यंत, ट्रस्टी बँकेकडून मिळालेल्या योगदानाची पुर्तता दुसऱ्या दिवशी (T+1) केली जात होती. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने याबद्दल माहिती दिली. 

काही काळापूर्वी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई केली होती. दरम्यान 20 जुलै 2024 रोजी शून्य शिल्लक असलेले निष्क्रिय वॉलेट आणि एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणतेही व्यवहार झालेले नसलेले वॉलेट बंद केले जातील, अशी माहिती पेटीएम पेमेंट्स बँकेने दिली आहे. 

ICICI बँकेने 1 जुलैपासून क्रेडिट कार्डशी संबंधित काही नियम बदलणार असल्याची घोषणा केली.. 1 जुलैपासून अनेक नियम बदलत आहेत. यात कार्ड बदलण्याचे शुल्कदेखील वाढवण्यात आले आहे. जे 100 रुपयांवरून 200 रुपये करण्यात आले आहे.

पंजाब नॅशनल बँकेने RuPay प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी लाउंज एन्ट्री अपडेट केली आहे. नवीन नियम 1 जुलै 2024 पासून लागू होतील. या बदलांतर्गत, देशांतर्गत विमानतळ किंवा रेल्वे लाउंजचा प्रवेश एका तिमाहीत एकदा उपलब्ध असेल. आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंजमध्ये संपूर्ण वर्षातून फक्त दोनदा प्रवेश मिळू शकतो.

पश्चिम बंगाल सरकार 1 जुलैपासून राज्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 30 मिनिटांनी वाढवणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान उद्योग मंत्री बाबुल सुप्रियो यांनी ही माहिती दिली. माहिती तंत्रज्ञान उद्योगाची अनेक वर्षांपासूनची मागणी राज्य सरकारने या निर्णयाद्वारे पूर्ण केली आहे. मात्र, आठवड्यातील कमाल 48 तासांच्या मर्यादेत कोणताही बदल होणार नाही, असेही ते म्हणाले. 

चीन आणि सर्बिया या दोघांनी आपापल्या देशांतर्गत मान्यता प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत आणि चीन-सर्बिया मुक्त व्यापार करार 1 जुलै रोजी अधिकृतपणे अंमलात येणार आहे. चीन-सर्बिया मुक्त व्यापार करार अंमलात आल्यानंतर, चीन आणि सर्बिया हळूहळू 90% कर आकारलेल्या वस्तूंवरील परस्पर शुल्क काढून टाकतील. त्यापैकी, 60% पेक्षा जास्त कर आकारलेल्या वस्तू ज्या दिवशी टॅरिफ करार लागू होईल त्या दिवशी त्वरित रद्द केले जातील. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link