‘दिलरुबा’ वादकाने तीन मुलांना दिले संगीत प्रशिक्षण, दोन फ्लॉप ठरले तिसरा बनला पंकज उधास!

Mansi kshirsagar Mon, 26 Feb 2024-6:00 pm,

जेष्ठ गझलकार आणि गायक पंकज उधास यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. पंकज उधास यांची अनेक गाणी अजरामर ठरली आहेत. पंकज यांचा जन्म गुजरातच्या जेतपुरमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव केशुभाई उधास तर आईचे नाव जितुबेन उधास आहे. 

पंकज उधास यांचे वडिल केशुभाई हे सरकारी कर्मचारी होती. एकदा त्यांची ओळख प्रसिद्ध वीणा वादक अब्दुल करीम खान यांच्यासोबत झाली. त्यांनी त्यांच्याकडून दिलरुबा नावाचे वाद्य शिकले होते. 

पंकज जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचे वडिल मोठ्या आवडीने दिलरूबा नावाचे वाद्य वाजवायचे. हळूहळू पंकज यांच्यासह त्यांच्या दोघा भावांनाही संगीतात रुची निर्माण झाली. पंकज यांचे भाऊ निर्मल उधास आणि मनहर उधास हेदेखील गायक आहेत.

मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांनी तिन्ही मुलांना राजकोट येथील संगीत अकादमीत शिक्षणासाठी पाठवले. पंकज उधास हे सुरुवातीला तबला वादन करायचे. मात्र, त्यानंतर गुलाम कादिर खान साहब यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर उधास ग्वालियर घराण्याचे गायक नवरंग नागपुरकर यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला आले. 

 पंकज उधास यांनी चित्रपट कामनासाठी पहिले गाणे गायले होते. चित्रपट जरी फ्लॉप ठरला तरी त्यांच्या गाण्याची खूप तारीफ झाली. गझल गायकच्या रुपात करियर घडवण्यासाठी त्यांनी उर्दू शिकली. त्यानंतर देश-विदेशात त्यांनी गझल संगीताचे कार्यक्रम केले. 

1980 मध्ये त्यांचा पहिला म्युझीक अल्बम आहट रिलीझ झाला होता. त्यानंतर ते खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाले. 2011 पर्यंत त्यांनी 50हून अधिक अल्बम आणि शेकडो अल्बमचे संकलन केले.

पंकज उधास यांचे चांदी जैसा रंग हे तेरा, सोने जैसे बाल, चिठ्ठी आई है यासारखी अनेक गाणी लोकप्रिय ठरली. पंकज उधास यांना भारतातील चौथ्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्रीने सन्मानिक करण्यात आले आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link