मराठी माणसाने पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी जिंकलेले पहिले सुवर्णपदक, आयुष्यावर चित्रपटही निघालेला

Mansi kshirsagar Sun, 08 Sep 2024-2:29 pm,

पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होणार आहे. भारताने स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केली आहे. भारताने आत्तापर्यंत 29 पदकं जिंकली असून यात 7 स्वर्ण, 9 रजत आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. पण तुम्हाला हे माहितीये का भारताला पॅरालिम्पिकमध्ये  पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे कोण होते?

 

मुरलीकांत पेटकर यांनी पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते. हेडलबर्ग येथे १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये, मुरलीकांत पेटकर यांनी पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 

 

मुरलीकांत हे भारतीय लष्करात शिपाई होते. मात्र 1965च्या लढाईत त्यांना 9 गोळ्या लागल्या. त्यामुळं त्यांना अपंगत्व आले. पाठीच्या कण्यालाही गोळी लागली होती. 

सांगली जिल्ह्यातील पेठ इस्लामपूर हे त्यांचे मूळ गाव आहे. मुरलीकांत हे सैन्यात शामील झाले मात्र, त्यांना खेळाची आधीपासून आवड होती. तिथे त्यांनी बॉक्सिंग शिकले. त्यांना ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधीदेखील मिळाली होती. 

 १९६५ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात मुरलीकांत पेटकर यांना ९ गोळ्या लागल्या होत्या. तेव्हा ते 18 महिने कोमात होते. त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाला अर्धांगवायू झाला. मात्र तरीही ते खचले नाहीत. 

१९७२ मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये त्यांनी देशासाठी सुवर्णपदक जिंकले. ५० मीटर फ्री स्टाईल जलतरणात ३७.३३ सेकंद वेळेसह आपल्या नावाची इतिहासात नोंद केली आहे. 

मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर चंदू चॅम्पियन हा चित्रपट देखील बनवण्यात आला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनने मुख्य भूमिका साकारली आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link