PHOTO: तुमच्या जन्मतारखेत दडले आहे तुमच्या स्वभावाचे रहस्य, जाणून घ्या जन्मतारखेनुसार व्यक्तीचा स्वभाव

Wed, 10 Jul 2024-11:51 am,

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखांना मुलांक असं म्हणतात. जसं की तुमची जन्मतारीख 1 आणि 10, 19, 28 असल्यास तुमचा मुलांक हा १ असतो. यापद्धतीने तुमचा मुलांक ठरतो. 

 

ज्यांची जन्मतारीख 1 आणि 10 असते त्यांच्या जन्मतारखेची बेरीजही 1 येते. ज्यांच्या मुलांक  1 येतो अशा व्यक्तींवर सुर्याचा प्रभाव जास्त असतो. ही माणसं सूर्यासारखीच तेजस्वी असतात. या माणसांमध्ये नेतृत्वगुण चांगले असतात. यांना  पोट,पाठदुखी, हृदयविकार आणि रक्तासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. अंकशास्त्रानुसार या माणसांनी तेलकट पदार्थ खाणं टाळावं.  आहारात ,सुका मेवा आणि फळांचं समावेश करावा. 

2, 11, 20, 29 या तारखेस जन्माला आलेल्या व्यक्तींचा मुलांक हा 2 असतो. या मुलांकाचा स्वामी चंद्र ग्रह आहे. चंद्राच्या अधिपत्याखाली असलेली ही माणसं मनाने हळवी असतात. ही माणसं प्रचंड शांत आणि समजूतदार  स्वभावाची असतात. चंद्र हा मनाचा कारक असतो. त्यामुळे यांना मानसिक नैराश्य आणि निद्रानाशाचा त्रास होतो. या व्यक्तींना आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आहारात काकडी,गाजर आणि मुळा यांचं सेवन करावं. 

 

 3, 12, 21 आणि 30 जन्मातारीख असलेल्या व्यक्तींचा मुलांक 3 येतो. या मुलांकाच्या माणसांवर गुरु ग्रहाचा प्रभाव पाहायला मिळतो. गुरुच्या अंमलाखाली असलेली ही माणसं अत्यंत ज्ञानी असतात. या व्यक्तींना घसा आणि फुफ्फुसाशी संबंधित समस्या होते. त्यामुळे यांनी आहारात चरबीयुक्त पदार्थांचं सेवन करणं टाळावं. सफरचंद, डाळिंब, द्राक्षे, अननस, चेरी, बदाम, खाणं  यांच्यासाठी फायदेशीर ठरतं. असं अंकशास्त्र सांगतं. 

 4, 13, 22 आणि  31 तारखेला जन्मलेल्या माणसांचा मुलांक हा 4 असतो. या मुलांकांचा स्वामी राहू असल्याने या व्यक्ती प्रमाणापेक्षाही खूप जास्त विचार करतात. या व्यक्ती कल्पनाविलास खूप करतात. या व्यक्तींनी आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ,सकाळी ध्यान करावं असं अंकशास्त्र सांगतं. 

 

5, 14 आणि 23 या तारखेला जन्मलेली माणसं ही बुधाच्या अधिपत्याखाली येतात. ही माणसं प्रचंड बुद्धीमान आणि काहीसे धुर्त स्वभावाचे असतात. या माणसांचं संवाद कौशल्य उत्तम असतं. या व्यक्तींना सर्दी, खोकला किंवा फ्लू, त्वचा विकार, किडनीचा त्रास होतो. त्यामुळे यांनी दही,ताक कोशिंबीर चा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

6, 15आणि 24 तारखेला जन्माला आलेली माणसं दिसायला सुंदर आणि कलारसिक असतात. यांना चांगले कपडे, परफ्युम आणि फिरण्याची आवड जास्त असते.   6 मुलांक असलेल्या माणसांचा स्वामी शुक्र असल्याने ही माणसं फार कोणाशी बोलत  नाही त्यामुळे लवकर नैराश्यात जातात. यांना किडनीचा त्रास जाणवतो, म्हणनच यांनी भरपूर पाणी प्यावं तसंच ताज्या फळांचा ज्यूस पिणं यांच्यासाठी आरोग्यवर्धक आहे. 

7, 16 आणि  25  या जन्मलेल्या माणसांचा मुलांक 7 असतो. केतूचा यांच्यावर प्रभाव असल्याने या माणसांची इच्छाशक्ती  दांडगी असते. यांनी पुढे काय होणार , एखाद्याच्या मनातील वाईट विचार यांना चटकन कळतात. बऱ्याचदा 7 मुलांकाच्या माणसांमध्ये व्हिटामीन 'डी' ची कमतरता जास्त आढळते. त्यामुळे कोणत्याही मादक पदार्थाचं सेवन करु नये. यांनी आहारात व्हिटामीन 'डी'यु्क्त पदार्थांचं सेवन करावं. 

 

8,17 आणि26 या तारखेचा मुलांक  8 येतो. या माणसांवर शनि ग्रहाचा परिणाम जास्त असतो. ही माणसं कष्टाळू आणि संयमी स्वभावाची असतात. यांना यशस्वी होण्यासाठी बराच वेळ जातो, त्यामुळे ही माणसं नैराश्यात जातात. यांना मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. 

 

 9 मुलांक असलेल्यांची जन्मतारीख ही 9, 18 आणि 27 येते. यावर मंगळाचं राज्य आहे. ही माणसं तापट स्वभावाची असतात. मंगळ स्वामी असल्याने हे चांगले राज्यकर्ते देखील होतात. यांनी मांसाहार आणि तेलकट पदार्थ कमी खावेत. अंकशास्त्र म्हणतं. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link