प्रभू श्रीराम, वनवास आणि पंचवटी... काय आहे काळाराम मंदिराचा इतिहास?

Fri, 12 Jan 2024-1:02 pm,

Nashik Kalaram Mandir history : काळाराम मंदिरात पंतप्रधान दाखल होण्यापूर्वीपासून या मंदिराचं राज्यात असणारं महत्त्वं अधिक होतं. पण, मोदींच्या या दौऱ्यामुळं देशभरात या मंदिराबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली. हे मंदिर कुठं आहे इथपासून त्याचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्वं जाणून घेण्यासाठीचे कैक प्रश्न अनेकांच्याच मनात घर करून गेले. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले त्या काळाराम मंदिराचं पौरायणिक महत्त्वंही मोठं आहे. असं म्हणतात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांनी त्यांच्या वनवासातील बराच काळ सध्याच्या राम मंदिर परिसरात म्हणदेच पंचवटी भागामध्ये व्यतीत केल्याची आख्यायिका आहे. 

असं सांगितलं जातं की इथं फार काळापूर्वी श्रीरामाचं लाकडी मंदिर होत. दरम्यान, माधवराव पेशवे यांच्या मातोश्री गोपिकाबाई पेशवे यांचं त्या काळात पुण्याहून नाशिकला येणंजाणं होतं. त्याचवेळी जिथं साक्षात प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शानं भूमी पावन झाली आहे तिथं राम मंदिर असावं असा ध्यास गोपिकाबाईंनी घेतला. 

माधवराव पेशवे यांचे मामा आणि ओढा येथील पेशव्यांचे संस्थानिक सरदार रंगराव ओढेकर यांच्यावर त्यांनी या मंदिर उभारणीची जबाबदारी सोपवली. सहा वर्षांच्या कालखंडात मंदिर साकारलं गेलं. असं म्हणतात की, या मंदिर उभारणीसाठीचा दगड रामशेज किल्याजवळून आणण्यात आला होता. 

 

आखणी होऊन अखेर मंदिर उभारणीला सुरुवात झाली. 1782 मध्ये नागर शैलीत या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली आणि सहा वर्षांत त्याचं बांधकाम पूर्ण झालं. 

 

84 मीटर लांब आणि 32 मीटरची रुंदी असणारं हे मंदिर उभं राहिलं आणि पाहणाऱ्यांचे डोळे दीपले. सध्याच्या घडीला या मंदिराला 4 दरवाचे असून, त्याच्या आवारात चौऱ्याऐंशी ओवऱ्या आहेत. 

 

मंदिराच्या शीरस्थानी भूभागापासून 69 फूटांवर सोन्याचा कळस शोभून दिसत आहे. या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणी वालुकामय मूर्ती आहेत. श्रीरामाच्या मूर्तीवरूनच या मंदिराला काळाराम मंदिर असं संबोधलं जातं. काय मग, साक्षात प्रभू रामाच्या पदस्पर्थानं पावन झालेल्या या भूमीत तुम्ही कधी भेट देताय? 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link