मतदान केंद्रावरील 2 रुपयांचा नियम माहिती आहे का? यामुळे रोखता येते बोगस वोटींग!

Pravin Dabholkar Sun, 19 May 2024-2:24 pm,

Polling Booth Rules: देशातील पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होतोय. 13 मतदार संघातील मतदार आपला खासदार निवडण्यासाठी मत देणार आहेत.  यावेळी एकूण सात टप्प्यात मतदान होत असून 4 जून रोजी निकाल लागणार आहेत.मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनवर जाऊन तुम्हाला मत देता येते. 

बनावट मतदान झाल्याच्या तक्रारी काही पोलिंग बुथवरुन समोर येतात. यासाठी मतदान केंद्रात 2 रुपयांचा नियम असतो. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

अनेकवेळा मतदानादरम्यान बनावट मतं टाकल्याच्या बातम्याही समोर येतात. याचा अर्थ काही लोक दुसऱ्याच्या नावानेही मतदान करण्याचा प्रयत्न करतात. 

अशा बनावट मतदारांना आळा घालण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आपले पोलिंग एजंट मतदान केंद्रावर पाठवतात. जे सर्व मतदारांवर लक्ष ठेवतात.

एजंटला मतदान केंद्रावर कोणावर संशय आला तर तो त्याला मतदान करण्यापासून रोखू शकतो. त्यासाठी वेगळा नियमही करण्यात आला आहे.

यासाठी पोलिंग एजंटने निवडणूक अधिकाऱ्याला कळवावे आणि दोन रुपये द्यावे लागतात. त्यानंतर संबंधित मतदाराची तपासणी केली जाते. मतदार बोगस असल्याचे आढळल्यास त्याचे मतदान रद्द केले जाते किंवा त्याला मतदान करण्यापासून रोखले जाते.

या प्रक्रियेला चॅलेंज वोटींग असे म्हणतात. जर मतदाराने आपली ओळख सिद्ध केली तर पोलिंग एजंटचा आक्षेप फेटाळला जातो आणि दोन रुपये जमा केले जातात.

आपण एकाला मतदान करतो आणि व्हीव्हीपॅटवर दुसऱ्या उमेदवाराची चिठ्ठी आली, अशा तक्रारी येतात. अशावेळी  2 रुपये फी देऊन फॉर्म ऑफ डिक्लेकेशन तुम्हाला भरावा लागेल. नियम क्रमांक 49MA अंतर्गत या घडलेल्या प्रकाराची शहानिशा केली जाते आणि कारवाई होते. 

पीठासीन अधिकारी मतदाराच्या तक्रारी संदर्भात एक माँक पोल घेतात आणि विवी पॅटला पुन्हा एकदा तपासतात. जर मतदाराने केलेला दावा योग्य असेल तर अशावेळी मतदान थांबवण्याच्या सूचना दिल्या जातात. आणि संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ याबद्दल कळवण्यात येते. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link