...म्हणून सुधा मूर्तींना पतीने `इन्फोसिस`मध्ये दिला नाही जॉब; तरी वर्षिक कमाई ₹300 कोटी कशी?

Swapnil Ghangale Fri, 08 Mar 2024-4:23 pm,

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एका सोहळ्यातील जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते सुधा मूर्ती यांना नमस्कार करताना दिसत आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारांमध्ये सुधा मूर्तींच्या नावाचा समावेश असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. "भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेतील सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांना नामांकित केल्याने मला आनंद होत आहे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

 

"सामाजिक कार्य, समाजसेवा आणि शिक्षण यासहीत विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान फार मोठं आहे. त्याचं काम फारच प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील त्यांची उपस्थिती ही आमच्या 'नारी शक्ती' धोरणाचा एक शक्तिशाली पुरावा आहे. ही (सुधा मूर्ती यांच्या रुपातील) नारी शक्ती आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि सन्मानाचे मूर्तीमंत उदाहरण देते. त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा," असं म्हणत मोदींनी सुधा मूर्तींच्या कार्याचा गौरव करत त्यांना या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्यात.

मात्र आता राज्यसभेच्या खासदार झालेल्या सुधा मूर्ती या इंजिनिअर असूनही त्यांना त्यांचे पती आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी कधीच कंपनीमध्ये काम का करु दिलं नाही हे तुम्हाला ठाऊक आहे का? किंवा या दोघांची एकूण संपत्ती किती आहे हे ठाऊक आहे का? या श्रीमंत पण साधी रहाणीमान असलेल्या जोडप्यासंदर्भातील रंजक गोष्टी जाणून घेऊयात सुधा मूर्तींना खासदारकी मिळाल्याच्या निमित्ताने...

 

सुधा मूर्ती या एकूण 755 कोटींच्या मालकीण आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुधा मूर्ती यांनी आतापर्यत 30 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं एकूण मूल्य 5,772.6 कोटी रुपये इतकं आहे.

इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या सुधा मूर्ती यांनी सुरुवातीला टाटा टेल्कोमध्ये काम केलं. त्यानंतर त्या काही काळ वालचंद ग्रुप कंपनीमध्ये काम करायच्या. त्यांनी नारायण मूर्तींबरोबर लग्न केल्यानंतर इन्फोसिसची स्थापना झाल्यावर इन्फोसिस फाऊंडेशनचं काम पाहण्यास सुरुवात केली.

 

सध्या सुधा मूर्तींची वार्षिक कमाई 300 कोटी रुपये इतकी आहे. इन्फोसिस कंपनीमध्ये त्या पहिल्या गुंतवणूकदार होत्या. नारायण मूर्तींनी पुण्यात 1981 साली इन्फोसिसची सुरुवात केली तेव्हा त्यांना पहिल्यांदा सुधा मूर्तींनीच मदत केली होती.

 

सुधा मूर्तींनी स्वत: बचत केलेल्या पैशांमधून 10 हजार रुपये नारायण मूर्तींना दिलेले. त्याच्या मोबदल्यात त्यांना दिलेल्या इन्फोसिस कंपनीमधील मालकीच्या 0.95 टक्के मालकी देण्यात आली. त्याच मोबदल्यात त्यांना वर्षाला 300 कोटी रुपये दिले जातात.

 

एवढ्या श्रीमंत असूनही सुधा मूर्ती यांनी मागील 30 वर्षांमध्ये एकही साडी खरेदी केलेली नाही असं सांगितलं जातं.

 

1996 सालापासून सुधा मूर्ती इन्फोसिस फाऊंडेशनचं काम पाहतात. त्या मागील 25 वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. नुकतीच त्यांची जागा इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी घेतली.

 

नारायण मूर्ती आणि सुधा मूर्तींची एकूण संपत्ती 37,465 कोटी रुपये इतकी आहे.

मात्र कंपनी स्थापन करण्यासाठी सुरुवातीला मदत करणाऱ्या सुधा मूर्तींना नारायण मूर्तींनी कधीच कंपनीमध्ये काम करु दिलं नाही. यामागील मुख्य कारण उद्योग क्षेत्रात घराणेशाहीला आपल्या माध्यमातून प्रोत्साहन मिळता कामा नये असं नारायण मूर्तींना वाटत असल्याने त्यांनी कधीच सुधा मूर्तींना स्वत: मालक असूनही उद्योग व्यवसायामध्ये सक्रीयपणे सहभागी होऊ दिलं नाही. एकीकडे आपल्या मुलांसाठी किंवा कुटुंबियांना नियमांचं उल्लंघन करुन अनेकजण सेटल होण्यास मदत करत असताना नारायण मूर्तींची ही भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे.

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link