दगडूशेठ साकारणार रहस्यमयी जटोली शिवमंदिराची प्रतिकृती, दगडात लपलंय आवाजाचं गुपित!

Saurabh Talekar Mon, 10 Jun 2024-12:22 am,

गणेशोत्सवासाठी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंडळ सज्ज झालं आहे. यंदा गणेशोत्सवात जटोली शिवमंदिराचा देखावा साकारणार आहे.

हिमाचल प्रदेशात हे जटोली शिवमंदिर आहे. याच मंदिराची प्रतिकृती यंदा दगडूशेठ गणपतीसाठी साकारणार आहे.

कलादिग्दर्शक अमोल विधाते यंदा हा देखावा साकारणार आहेत. या देखाव्याच्या सजावटीचं पूजन आज करण्यात आलं. 

या मंदिरात लावलेल्या दगडांवर जेव्हा ठोकला जातो, तेव्हा दगडांमधून डमरूसारखा आवाज येतो, असं गावकरी आणि भक्त सांगतात. अनेकांना याची अनुभव आला आहे.

भगवान शंकर या मंदिरात येऊन थांबले होते, अशी मान्यता आहे. या ठिकाणी भगवान शिवाने तपश्चर्या केली होती असे म्हणतात. मंदिर बांधण्यासाठी सुमारे 39 वर्षे लागली असं देखील म्हटलं जातं.

स्वामी कृष्णानंद परमहंस 1950 मध्ये येथे आले तेव्हा सोलनमध्ये पाण्याची टंचाई होती. अशा स्थितीत स्वामी कृष्णानंद परमहंसांनी कठोर तपश्चर्या केली. 

शिवाने आपल्या त्रिशूळाचा प्रहार करून हा जलसाठा निर्माण केला. त्रिशूळ जमिनीवर आदळताच पाण्याचा प्रवाह बाहेर आला, असंही स्थानिक लोक सांगतात.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link