मुंबईत आला तेव्हा ना घर, पोट भरण्यासाठी ना पैसे; आज आहे 12 पास अभिनेता 20 कोटींचा मालक

नेहा चौधरी Tue, 16 Jul 2024-11:17 pm,

हा चिमुकला प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी आहे. आज त्याचा 55 वाढदिवस साजरा करतोय. आम्ही बोलतोय भोजपुरी अभिनेता आणि लापता लेडीजमधील पोलिसाची भूमिका साकारणारा रवि किशन यांच्याबद्दल. आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याने केवळ चित्रपटसृष्टीतच नाही तर राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.

रवि किशन यांचं पूर्ण नाव रवी किशन शुक्ला असून त्यांनी केवळ 12वीपर्यंतच शिक्षण घेतलंय. वडिलांना त्यांनी सांगितलं की, अभिनेता बनायचे आहे तर त्यांनी मारहाण केली. त्यानंतर रवि किशन मुंबईत पळून आले. इथे मुंबईतील चाळीत 12 जणांसोबत तो एका खोलीत राहत होता. 1992 मध्ये आलेल्या 'पिताबर' या चित्रपटातून अभिनय करिअरला सुरुवात केली. पण 2003 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर 'तेरे नाम' या चित्रपटातून त्याला इंडस्ट्रीत ओळख मिळाली.

रवि किशन यांनी एका मुलाखती सांगितलं की, मी दुधाने आंघोळ करायचो आणि गुलाबाच्या पाकळ्यांवर झोपायचो कारण मला वाटायचे की मी दुधाने आंघोळ केली तर तो दुधाने आंघोळ करतो अशी चर्चा होईल.

अभिनेत्याने सांगितले की, एकदा त्याला अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र या कामाच्या बदल्यात आंघोळीसाठी 25 लिटर दुधाची आणि झोपण्यासाठी गुलाबाच्या फुलांनी सजवलेला पलंग मागितला होता, त्यामुळे हा चित्रपट त्याच्या हातातून गेला होता.

आपल्या आईला ₹75 किमतीची साडी भेट देण्यासाठी अभिनेत्याने घरोघरी वर्तमानपत्रे विकली होती. आज हा स्टार मुंबईतील गोरेगाव गार्डन इस्टेटमध्ये आलिशान घरात राहतो. मीडिया रिपोर्टनुसार याची किंमत 20 कोटींचा आहे. 

रवी किशन यांच्याकडे मुंबईत 6 फ्लॅट असून, प्रत्येक फ्लॅटची किंमत प्रत्येकी एक कोटी रुपये इतकी आहे. यासोबतच त्यांच्याकडे 5 कोटी 72 लाख रुपये किमतीचे 2 व्यावसायिक फ्लॅट्स आहेत. तर त्याच्याकडे 14 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा, 19 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ, 13 लाख रुपयांची BMW 15 आणि 40 लाख रुपयांची सर्वात महागडी Jaguar Fpace आहे.

रवी किशनकडे एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि एक लाख रुपये किमतीची रायफलही त्यांनी निवडणूक आयोगात 2019 मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.रवी किशन यांनी भोजपुरीमध्ये 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link