बिअर किंवा दारुसोबत चखणा म्हणून शेंगदाणे का खातात? फायदे वाचाल तर थक्क व्हाल!

Thu, 22 Jun 2023-5:20 pm,

दारु पितांना चखण्याचे महत्व काय? हे दारु पिणाराच जाणतो आणि तोच सांगू शकतो. विशेषत: या चखन्यामध्ये शेंगदाण्यांना फार महत्व दिले जाते. फ्राईड शेंगदाने किंवा थोडेसे उकळून त्यावर मीठ टाकलेल्या शेंगदाण्याचा दारुसोबत चखना म्हणून सर्वाधिक ऊपयोग केला जातो. 

दारूसोबत शेंगदाणे खाणाऱ्यांना लवकर तहान लागते. शेंगदाण्यामध्ये मीठ असेल तर बाकीचे काम त्याच्याबरोबर होते. वास्तविक, मीठ पाणी शोषून घेते आणि जेव्हा तुम्ही शेंगदाणे खाता तेव्हा ते तोंड आणि घशातील आर्द्रता शोषून घेते आणि कोरडे करते.

त्यानंतर तुम्हाला तहान लागते आणि तुम्ही एक घोट घेऊन घेऊन पिता. ही प्रक्रिया चालू राहते आणि तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त मद्यपान कराल. 

 

अल्कोहोल बहुतेकदा कडू असते आणि खारट शेंगदाण्याचे काही दाणे खाल्ल्यानंतर पेय पिणे सोपे होते. वास्तविक शेंगदाणे आपल्या स्वाद ग्रंथींवर अशा प्रकारे कार्य करतात की, त्यानंतर अल्कोहोलचा कडूपणा थोडा कमी जाणवू लागतो. 

जेव्हा शरीरात पाणी कमी असते तेव्हा हे कॉम्बो रिहायड्रेशनमध्ये मदत करते. शास्त्रज्ञांच्या मते, नट्समध्ये पोटॅशियम असते तर बिअरमध्ये जीवनसत्त्वे आणि कार्बोहायड्रेट्स असतात. अशा परिस्थितीत, दोन्हीचे मिश्रण शरीरातील पाणी आणि खनिजांची कमतरता दूर करण्यास सक्षम आहे.

शेंगदाण्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, अल्कोहोल शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढवते. शेंगदाण्यातही भरपूर फॅट असते आणि त्यामुळे वजन वाढते. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link