Secret Of Tying Kalava : `या` 5 झाडांना कलावा बांधणे शुभ, राहू-शनीचा प्रकोप दूर होऊन पैशांची होईल बरसात

Wed, 25 Jan 2023-10:29 am,

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. तुळशीत लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे ती अत्यंत पवित्र मानली जाते. शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला छोटा कलावा बांधल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होता. 

केळीचं झाडही हिंदू धर्मात शुभं मानलं जातं. शास्त्रानुसार गुरुवारच्या (Guruwar Upay) दिवशी केळीच्या झाडाला कलावा बांधल्यामुळे तुमच्यावर बृहस्पति ग्रहाचा आशीर्वाद मिळतो, असं शास्त्रात सांगितलं आहे.  त्यामुळे गुरुवारच्या दिवशी विवाहित महिला केळीच्या झाडाची पूजा करतात. 

शनिदोषापासून (Shani Dosh Upay) मुक्ती मिळवण्यासाठी आणि महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शमीच्या रोपाला कलावा बांधणं शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शमीच्या रोपाला कलावा बांधला पाहिजे. याशिवाय या उपायामुळे राहूचे दोषही (Rahu Dosh Upay) दूर होतात.

हिंदू धर्मात पिंपळाचं झाड पवित्र मानलं जातं. या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. या झाड्याचा पानांमध्येही देवी देवतांचा वास असतो. मंगळवारी (Mangalwar ke Upay)आणि शुक्रवारी (Shukrawar Upay) पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर कलावा बांधल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. 

वटवृक्षाची पूजा ही हिंदू धर्मात केली जाते. वट सावित्री व्रताच्या दिवशी महिला या झाडाची पूजा करतात. असं मानलं जातं की विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला पूजन केल्यानंतर कलावा बांधला तर त्यांचा नवऱ्याला दीर्घायु प्राप्त होते आणि अकाली मृत्यूचा धोका टळतो.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link