शनि जयंतीला सुवर्ण संधी! आयुष्यातील अडचणी दूर करा `हे` महाउपाय

Thu, 06 Jun 2024-1:00 pm,

शनि दोष, शनि साडेसाती, धैय्या आणि आयुष्यातील अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनि जयंतीला उपाय करुन त्यांना प्रसन्न करण्याची ही सुवर्ण संधी आहे. 

हिंदू धर्मात दानधर्माला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे शनि जयंतीला काळी चप्पल, काळी छत्री, काळी उडीद डाळ, काळे तीळ, काळे कपडे दान करणं शुभ मानले जाते. 

आज शनिदेवासह हनुमानजीचीही पूजा करावी आणि हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावं. 

शनिदेवाने हनुमानजींना वचन दिलं होतं की जो कोणी बजरंगबलीची पूजा करेल तो शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून वाचेल.

शनि जयंतीच्या दिवशी सावली दान करणे अतिशय शुभ मानले जाते. साडेसाती आणि धैय्या मुक्तीसाठी लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल टाकून त्यात आपली प्रतिमा पहावी. नंतर हे तेल आणि वाटी शनि मंदिरात अर्पण करावी. 

शनि मंदिरात जाऊन राईच्या तेलाचा दिवा लावा. ओम नीलांजन समभासं रवी पुत्रम यमाग्रजं, छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरं' या मंत्राचा 108 वेळा जप करा. 

शनी देवाची दहा नावं शनैश्चरा, शांता, सार्वभीष्ट प्रदायीन, शरण्या, वरेण्या, सर्वेशा, सौम्य, सर्वज्ञ, सुरलोकाविहारीण, सुखसनोपविष्ट या नावांचा उच्चार करावा. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)  

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link