मागच्या 6 महिन्याची कॉल हिस्ट्री हवीय? करा फक्त एवढंच

Pravin Dabholkar Sat, 10 Feb 2024-4:41 pm,

Smartphones Call History: स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.  कॉलिंग, मेसेजिंगपासून इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी स्मार्टफोनची गरज लागते. दिवसभर आपल्याला अनेक फोन कॉल्स येत असतात. अशावेळी मागच्या एखाद्या महिन्यात आपण कोणाला फोन केला? हे आपल्याला आठवत नाही. पण तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. 

एक महिन्याची कॉल हिस्टरी मिळवणे खूप सोपे असती. ती तर तुम्हाला तुमच्या  फोनवरील कॉल लॉगमध्ये मिळून जाईल. टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना यासाठी पर्याय देतात. अनेकांना याबद्दल माहिती नसते. 

तुम्हाला गेल्या 6 महिन्यांचे कॉल डिटेल्स मिळवायचे असतील तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करुन मिळून जाईल. जिओ आणि एअरटेलचे नेटवर्क वापरणाऱ्यांना ही माहिती फायदेशीर ठरणार आहे. 

जिओ युजर्स असाल तर MyJio ॲप वापरून तुमचे कॉल रेकॉर्ड काढू शकता. यासाठी सर्वातआधी MyJio ॲप इन्स्टॉल करा

लॉग इन करुन सर्वात आधी तुमचा जिओ नंबर लिंक करा. यानंतर ॲपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात 3 डॉट लाइनवर क्लिक करा आणि 'माय स्टेटमेंट' पर्यायावर टॅप करा.

आता तुम्हाला कॉल रेकॉर्ड हवी ती तारीख निवडा. यानंतर View वर टॅप करा. आता कॉल रेकॉर्ड तुमच्या समोर येतील.

एअरटेल युजर्स असाल तर मोबाईलवर मेसेज ॲप उघडा आणि रिसीव्हरवर '121' डायल करा.

आता मेसेजमध्ये 'EPREBILL' टाइप करा. यानंतर कॉल डिटेल्स हवी असलेली तारीख डायल करा.

त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाका. शेवटी तुमच्या एअरटेल मोबाईल नंबरवरून मेसेज पाठवा.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link