परदेशातील नोकरीवर पाणी सोडून दिली यूपीएससी; आधी IPS आणि नंतर IAS; गरिमाची प्रेरणादायी कहाणी

Pravin Dabholkar Tue, 09 Jul 2024-8:36 am,

IAS Garima Agrawal:गरिमा अग्रवाल या 2019 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. आयआयटीमध्ये शिकलेल्या गरिमा यांनी विदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडली. आपल्या देशासाठी काहीतरी करायचं हे स्वप्न घेऊन त्यांनी यूपीएससी दिली. जाणून घेऊया त्यांची प्रेरणादायी कहाणी.

गरिमाचा यांचा जन्म मध्य प्रदेशातील खरगोन येथील एका व्यापारी कुटुंबात झाला. त्यांनी खरगोन येथील सरस्वती विद्या मंदिरातून आपले शिक्षण पूर्ण केले. गरिमा यांना 10वी बोर्ड परीक्षेत 89% आणि 12वी मध्ये 92% गुण मिळाले होते.

गरिमा यांनी जेईई ही जगातील दुसरी सर्वात कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली होती. यावरुन आपल्याला गरिमा यांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज लावता येतो. यानंतर त्यांनी आयआयटी हैदराबादमधून बीटेक पदवीदेखील मिळवली होती.

पुढे जाऊन गरिमा यांना जर्मनीतील एका कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली पण त्यांनी ती नाकारली. भरघोस पगाराची नोकरी करण्याचा मोह सोडून त्यांनी देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्या भारतात परतल्या आणि यूपीएससीची तयारी करु लागल्या.

मेहनत आणि समर्पणामुळे गरिमा यांनी पहिल्याच प्रयत्नात 240वा रॅंक मिळवला. यानंतर त्यांची IPS अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. एखाद्या उमेदवारासाठी हे पूर्ण झालेले अंतिम स्वप्न ठरु शकते. पण गरिमा यांच्याबाबतीत तसे नव्हेत. त्यांचे लक्ष आयएएस पदाकडे होते. यामुळे  आयपीएस प्रशिक्षणासोबतच त्यांनी नागरी सेवा परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नाची तयारीही सुरू ठेवली.

गरिमा अग्रवालला यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले. पण हरणे हे त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. त्यांनी 2018 मध्ये दुसरा प्रयत्न केला आणि यात त्यांना घवघवीत यश मिळाले. गरिमा यांना ऑल इंडिया 40 वा रॅंक आणि भारतीय प्रशासकीय सेवा केडर मिळाले त्यानंतर आयएएसचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या सरकारी अधिकारी झाल्या.

IAS गरिमा यांच्या पतीचे नाव पल्लव टिन्ना असून ते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. पल्लव यांनी लिंक्डइन प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी IIT हैदराबादमधून B.Tech देखील केले आहे. गारिमा अग्रवाल आणि पल्लव टिन्ना यांनी 2021 साली मोठ्या थाटामाटात लग्न केले. गरिमा अनेकदा स्वत:चे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात.

यूपीएससी उमेदवारांसाठी गरिमा यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. लेखन क्षमता विकसित करण्यावर त्या भर देतात. यासाठी दररोज लेखनाचा सराव करणे आवश्यक असल्याचेही त्या अधोरेखित करतात. यश मिळविण्यासाठी लक्ष केंद्रित करून अभ्यास करणे आणि चांगली रणनीती बनवणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात.  UPSC प्रिलिम्स परीक्षा पूर्ण केल्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी शक्य तितक्या मॉक टेस्ट द्याव्यात, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link