IAS Success Story: वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकीने घेतली मेहनत; IAS मुद्राचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणा

Pravin Dabholkar Mon, 22 Jul 2024-11:08 am,

IAS Mudra Gairola: करिअरमध्ये डॉक्टर, आयपीएस बनावं यासाठी देशातील लाखो तरुण दिवस रात्र एक करुन मेहनत घेत असतात. पण काहींची स्वप्न यानंतरही अपूर्णच असतात. त्यांना आयुष्यात आणखी मोठं काहीतरी करण्याची इच्छा असते. इतक्या मोठ्या पदावर पोहोचल्यावरही वडिलांची इच्छा अपूर्ण राहते. त्यामुळे लाडकी लेक यूपीएससी देते आणि आयएएस बनते. ही कहाणी आहे मुद्रा गायरोला यांची.

मुद्रा गायरोला या उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागच्या रहिवाशी आहेत. त्यांनी 2022 च्या यूपीएससी परीक्षेत 53 वा क्रमांक मिळवला होता.  मुद्रा यांना लहानपणापासूनच वाचन आणि लेखनाची आवड होती.

त्यांना 10वीच्या परीक्षेत 96% आणि 12वीच्या परीक्षेत 97% गुण मिळाले आहेत. करिअरमध्ये त्या यशस्वी होतील हा विश्वास त्यांच्या आईवडिलांना होता.

सुरुवातीला दंतचिकित्सक म्हणून करिअर करणाऱ्या मुद्राने तिच्या बीडीएस अभ्यासात चांगली कामगिरी केली आणि त्यांना सुवर्णपदक मिळाले. करिअरमधील पहिला टप्पा त्यांनी यशस्वी पूर्ण केला होता. पण त्यांचे खरे स्वप्न आणखी खूप दूर होते. तिथे त्यांना पोहोचायचं होतं.

मुद्रा यांच्या वडिलांचे नाव अरुण गोयराला. करिअरमध्ये आयएएस बनण्याची त्यांची इच्छा होती.यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. 1973 ला दिलेल्या यूपीएससीत त्यांना यश आले नाही. ते अपूर्ण स्वप्न लेकीने पूर्ण करावं अशी त्यांची इच्छा होती. 

वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार मुद्राने केला. आधी डॉक्टर मग आयपीएस असलेल्या मुद्रा यांनी आयएएस बनण्याचे मनाशी ठरवले. दिवसरात्र एक करुन मेहनत घेतली. 

2018 मध्ये मुद्रा मुलाखत फेरीत पोहोचल्या होत्या पण तिथे त्यांना अपयश आले. यानंतर त्यांनी प्रयत्न सोडला नाही. 2021 च्या परीक्षेत 165 वा रँक मिळवून त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द, चिकाटी आणि सोबत घरच्यांचा पाठींबा असेल तर स्वप्न साकार होऊ शकतं, हे मुद्रा यांच्या कहाणीतून शिकायला मिळतं. मुद्रा यांची कहाणी यूपीएससी देणाऱ्या लाखो तरुणांसाठी प्रेरणा बनली आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link