फोटो : नाशिकमध्ये `सुखोई` कोसळलं

Wed, 27 Jun 2018-12:20 pm,

 जखमींना पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं आहे. 

विमानाचे पत्रे व जळणारे भाग उडाले. ते शेतात काम करणाऱ्या काही मजुरांना लागल्यानं ते जखमी झाले.

त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमान जळत्या अवस्थेतच खाली कोसळलं.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आलं. त्यामुळे विमानाच्या दोन्ही पायलटनं पॅराशुटच्या साहाय्यानं उडी मारली.

घटना समोर आल्यानंतर तातडीनं मदतकार्य सुरू करण्यात आलं

विमान जळून खाक झालंय तर विमानाच्या दोन पायलटने उडी मारल्याने ते बचावले 

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत जवळच्या वावी ठुशी गावच्या ओझर मिग शिवारात वायुदलाचं लढाऊ सुखोई विमान दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळलं.

नाशिकमध्ये आज सकाळीच एक दुर्घटना घडलीय. नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळून अपघातग्रस्त झालंय. सुदैवानं वैमानिक सुखरुप असल्याची माहिती मिळतेय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link