वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीनं धर्मेंद्रच्या लगावलेली कानाशिलात; ती खुल्लम खुल्ला करायची `हे` काम
70 च्या दशकातील बॉलिवूडमधील अभिनेत्रीची मुलगी आणि जावई सगळेच चित्रपटसृष्टीचं नावाजलेली नावं आहेत. त्या काळात त्यांच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे त्या प्रसिद्ध होत्या.
काजोलची आई आणि सिंघम अजय देवगण यांची सासू तनुजा मुखर्जी यांचा आज वाढदिवस आहे. मराठी कुटुंबात 23 सप्टेंबर 1943 ला त्यांचा जन्म झाला. आई शोभना समर्थ अभिनेत्री आणि वडील कुमारसेन समर्थ हे निर्माते होते.
तनुजा लहान असताना आई वडील वेगळे झाले. तनुजाला नूतन, चतुरा आणि रेश्मा या तीन बहिणी होत्या आणि एक भाऊ जयदीप.
तनुजाने लहानपणापासूनच फिल्मी जग जवळून पाहिलं होतं. तनुजाने तिच्या करिअरची सुरुवात तिच्या बहिणीसोबत म्हणजेच नूतनसोबत केली होती. तनुजा 1950 मध्ये आलेल्या 'हमारी बेटी' चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. यानंतर तिने 'छबिली' (1960) या चित्रपटातून नायिका म्हणून पदार्पण केले.
तनुजाची आई आणि बहीण चित्रपटांशी संबंधित असल्याने हा मार्ग सोपा आहे असे तनुजाला वाटले. मात्र तनुजाने तिच्या मेहनतीच्या जोरावर अभिनयाच्या विश्वात स्वतःचे नाव कमवावे अशी आई शोभना यांची इच्छा होती.
'एक बार मुस्कुरा दो' चित्रपटाच्या सेटवर तनुजा यांची शोमू मुखर्जींची भेट झाली. काही दिवस एकमेकांना भेटल्यानंतर तनुजा आणि शोमू मुखर्जी डेट करू लागले. त्यानंतर 1973 मध्ये दोघांचे लग्न झाले. काजोल आणि तनिषा या दोन मुलींचा जन्म झाला. हे लग्न टिकलं नाही, ते वेगळे राहू लागले. दरम्यान शोमू यांचं वयाच्या 64 व्या वर्षी 10 एप्रिल 2008 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
तनुजाचं पर्सनल आणि प्रोफेशनलमधील अनेक रंजक किस्से आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त असे किस्से सांगणार आहोत ते ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
एका चित्रपटादरम्यान दिग्दर्शक केदार शर्माने तिला एका सीनमध्ये रडण्यासाठी सांगितलं. तनुजाने त्यांना गांभीर्याने घेतलं नाही आणि संपूर्ण सेटवर हसत फिरत राहिली. तनुजा यांचं हे वागण बघून दिग्दर्शकाला राग आला आणि त्याने तिच्या कानाखाली मारली.
तनुजा रडत रडत आईकडे गेली आणि झालेल्या प्रकरणाबद्दल सांगितलं. त्यानंतर आईने तनुजाला अजून एक कानाखाली मारली. त्यानंतर तनुजा त्यांच्या कामाबद्दल खूप गंभीर झाल्या आणि आज त्या बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत.
ज्या काळात तनुजा अभिनेत्री होत्या त्यावेळी त्या सेटवर आणि सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त सिगारेट ओढताना दिसायच्या. त्या काळ एका तरुणीचं असं वागणं म्हणजे तिच्या चारित्र्याबद्दल चुकीचा समज पसरायचा.
तनुजा यांचं हे कृत्य अभिनेत्री नाही तर अनेक अभिनेत्यांनाही आवडायचं नाही. त्यामुळे अनेकांनी चित्रपटसृष्टीत त्यांच्यापासून दुरावा ठेवला होता.
तुम्हाला जे जाणून आश्चर्य वाटेल की, तनुजाने धर्मेंद्र यांच्या कानाखाली मारली होती. झालं असं की, तनुजा आणि धर्मेंद्र 'चांद और सूरज' चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्यांची चांगली मैत्री झाली होती, दोघ खूप मस्ती करायचे आणि दारू प्यायचे.
चित्रपटाच्या शूटिंगमुळे ते तासंतास एकत्र वेळ घालवत होते. एका दारुच्या नशेत धर्मेंद्र यांनी तनुजासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. तनुजाला ते अजिबात आवडलं नाही. निर्लज्ज म्हणून तनुजाने धर्मेंद्रच्या कानाखाली मारली होती.