हस्ताक्षरावरून ओळखता येतो माणसांचा स्वभाव!
दोन शब्दांच्यामध्ये जास्त जागा सोडणाऱ्या लोकांना स्वातंत्र आवडते. पण जे लोक दोन शब्दांच्या मध्ये जास्त जागा सोडत नाहीत त्यांना लोकांसोबत रहायला आवडते. जर कोणी शब्द जास्त जोडून लिहित असेल तर त्याचा स्वभाव दुसऱ्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करणारा असतो. किंवा त्यांना गर्दी आवडत असते.
लिहितांना शब्दांच्या आकारावरूनही स्वभाव कळू शकतो. मोठ्या अक्षरात लिहिणारे लोक सामाजिक असतात. तर छोट्या अक्षर लिहिणारे लोक लाजाळु आणि अंतमुर्ख असतात. मध्यम अक्षरात लिहिणारे लोक ध्यान केंद्रित करणारे आणि खूप क्षमता असणारे असतात.
लिहिण्याच्या शैलीवरून सुद्धा माणसाचा स्वभाव कळू शकतो. जर कोणी लिहिताना पेनावर खुप जास्त दाब देत असेल तर त्यातून राग आणि तणाव दिसतो. कमी दाब देणारे लोक सहानभूतीपूर्ण आणि संवेदनशील असतात. पण यांच्या आयुष्यात शक्तीची कमतरता असू शकते. मध्यम दाब देणारे लोक त्यांच्या स्वभावातील वचनबद्धता दर्शवतात.
दोन अक्षरांमध्ये कमी किंवा जास्त जागा सोडण्यावरूनही स्वभाव कळतो. जर कोणी लिहितांना दोन अक्षरांमध्ये कमी जागा सोडत असेल तर तो तर्कशास्त्राला महत्त्व देणारा असेल. याशिवाय असे लोक जास्तीत जास्त निर्णय तथ्याच्या आणि अनुभवांच्या आधारे घेतात.
तिरकं लिहिणाऱ्या व्यक्ती जर डावीकडे तिरकं लिहित असतील तर त्या व्यक्तीला नवीन लोकांना भेटायला त्यांच्या बरोबर काम करायला आवडते. तर उजवी कडून तिरके लिहिणाऱ्या व्यक्तींना जास्त कोणाला भेटायला आवडत नाही, ते स्वतःला जास्त पसंती देतात.
लिहिण्याच्या वेगावरूनही स्वभावा बद्दल खुप काही कळु शकते. वेगाने लिहिणारे लोक कोणत्याही गोष्टीसाठी खुप अधीर असतात. आणि त्यांना वेळ वाया घालवायला आवडत नाही. तर हळू लिहिणारे लोक आत्मनिर्भर आणि नीटनेटके असतात.