Fridge मध्ये चुकूनही `हे` पदार्थ ठेवू नका, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

Fri, 09 Jun 2023-3:39 pm,

फ्रीजमुळे फळे आणि भाज्या दीर्घकाळ ताजे राहतात हे खरे आहे, पण सर्वच फळे आणि भाज्या फ्रीजसाठी बनवलेल्या नसतील. काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास खराब होऊ शकतात.

लसूण फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास ते सक्रिय होते आणि लवकर त्याला मोड येतात. अशा परिस्थितीत त्याची चवही खराब होते. तसेच अशा पद्धतीने लसूण खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लसूण फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी बाहेर ठेवा.

जर तुम्हाला वाटत असेल बटाटे जास्त काळ टिकावे तर त्यासाठी ते फ्रीजमध्ये नाहीतर एका खोलीत ठेवावे. किंवा बाहेर भाजीच्या टोपलीत ठेवण्याचा प्रयत्न करा. याने बटाटा लवकर खराब होत नाहीत. जर तुम्ही फ्रीजमध्ये बटाटे ठेवत असाल तर ते लवकर खराब होतील तसेच त्यांना मोड देखील येतील. 

बरेच लोक ब्रेड फ्रिजमध्ये ठेवतात. पण ही चूक तुम्ही करु नका. फ्रिजमध्ये ठेवल्याने ब्रेड लवकर सुकते. त्यामुळे ब्रेडमध्ये असलेला ओलावा नाहीसा होतो. अशा ब्रेडच्या चवीबरोबरच आरोग्यालाही हानी पोहोचते. म्हणून, ब्रेड साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ब्रेड बॉक्समध्ये ठेवणे किंवा स्वयंपाकघरात ठेवणे. 

फ्रीजमध्ये ठेवल्यास केळी लवकर खराब होतात. केळीच्या देठातून इथिलीन वायू बाहेर पडतो, त्यामुळे आजूबाजूची फळेही लवकर पिकतात. म्हणूनच केळी फ्रीजमध्ये ठेवू नयेत. त्यांना स्वयंपाकघराजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा एका बास्केटमध्ये ठेवा ज्याने केळी खराब होणार नाहीत. केळी बाहेरील वातावरणात लवकर पिकतात. फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव खराब होते. त्याचप्रमाणे थंड आणि खराब झालेली केळी देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

टोमॅटो हे कधीच फ्रीजमध्ये ठेवू नयेत. फ्रीजच्या थंड तापमानामुळे त्यांची चव खराब होऊ शकते. टोमॅटो हे सूर्यप्रकाशात वाढणारे फळ आहे जे थंड हवामानात खराब होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही रेफ्रिजरेटरमधून टोमॅटो वापरत असाल तर त्याची चवही बिघडते आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे टोमॅटो नेहमी बाहेरच ठेवावेत. फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.

 

( Disclaimer : वर देण्यात आलेल्या गोष्टी केवळ सामान्य माहिती प्रदान करतात. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास या गोष्टींची पुष्टी करत नाही. )    

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link