`या` चित्रपट निर्मात्याच्या नजरेत दीपिका आहे उत्तम अभिनेत्री!

Tue, 16 Jan 2018-3:36 pm,

दिग्गज चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज आपल्या आगामी चित्रपटात दीपिका पदुकोण आणि इरफान खानसोबत काम करणार आहे. त्यांनी सांगितले की, ''सध्याच्या काळातील दीपिका देशातील सर्वात उत्तम कलाकारांपैकी एक आहे आणि इरफान त्यांच्या आवडत्या अभिनेत्यापैकी एक आहे.''

विशाल यांनी एपीजे कोलकत्ता लिटररी फेस्टिवलमध्ये आपल्या कवितांच्या नविन पुस्तकासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आयएएनएसला सांगितले की, "खरंतर मी दीपिकासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे."

विशाल यांनी सांगितले की, "इरफान माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. तसंच तो उत्तम कलाकारही आहे. त्यामुळे मला त्याच्यासोबतही काम करायला आवडेल."

दीपिकासोबत पहिल्यांदा काम करत असणाऱ्या फिल्म निर्मात्याने सांगितले की, "चित्रपटाची पटकथा खूप पूर्वीच लिहिली गेली आहे आणि पद्मावत चित्रपटावरून झालेल्या वादातून दीपिकासोबत पुढील चित्रपट करण्यास त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही."

विशाल यांनी सांगितले की, "पटकथा दोन वर्षांपूर्वीच लिहून झाली होती आणि माझ्या मनात कोणतीही शंका नाही." 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link