Fastest 50 In IPL: वेगवान अर्थशतक झळकावणारे 10 खेळाडू; मुंबई इंडियन्सच्या दोघांचा समावेश

Swapnil Ghangale Fri, 12 May 2023-12:43 pm,

यशस्वी जयस्वालने गुरुवारी (11 मे 2023 रोजी झालेल्या) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 13 चेंडूंमध्ये अर्थशतक झळकावलं.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जयस्वालने पहिल्या स्थानी झेप घेतलीय.

वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या या यादीमध्ये नेमके कोणकोणते खेळाडू आहेत हे पाहूयात..

 

यशस्वीच्या आधी वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम के. एल. राहुलच्या नावे होता. 2018 मध्ये दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पंजाबकडून खेळताना 14 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

14 चेंडूंमध्ये वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पॅट कमिन्स यानेही केला आहे. त्याने मागील वर्षी मुंबई विरुद्धच्या सामन्यात कोलकात्याकडून खेळताना हा विक्रम नोंदवलेला.

वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्यांच्या यादीत केकेआरकडूनच यापूर्वी खेळलेला युसूफ पठाण चौथ्या स्थानी आहे. त्याने सन रायझर्स हैदराबादविरुद्ध 2014 मध्ये केवळ 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.

या अनोख्या विक्रमविरांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे वेस्ट इंडिजचा खेळाडू सुनील नरेन. केकेआरकडून खेळताना नरेनने 2107 साली आरसीबीविरुद्धच्या सामन्यात केवळ 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलेलं.

या यादीत नरेनच्याच राष्ट्रीय संघातील सहकारी निकोलस पुरनही आहे. निकोलस पुरनने यंदाच्याच वर्षी 10 एप्रिल रोजी आरसीबीविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या संघातून खेळताना 15 चेंडूत अर्थशतक ठोकलं आहे.

वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातव्या स्थानी चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैनाचा क्रमांक लागतो. त्याने 2014 साली पंजाबविरुद्धच्या सामन्यात 16 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.

या यादीमध्ये आठव्या स्थानी क्रिस गेलचाही समावेश आहे. 2013 साली आरसीबीकडून खेळताना वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने 17 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. पुण्याविरुद्धच्या सामन्यात गेलने 175 धावांची स्फोटक खेळी केली होती.

वेगवान अर्थशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये नवव्या स्थानी हार्दिक पंड्याचा समावेश आहे. 2019 साली मुंबईकडून खेळताना पंड्याने 17 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. कोलकात्याविरुद्ध त्याने ही कामगिरी केलेली.

या यादीमध्ये मुंबईच्या इशान किशन आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यामध्ये इशानने केवळ 21 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link