पुरुष असो वा महिला...अंडरवियरसंबधी `या` चुका सर्वच करतात; अजिबात करु नका दुर्लक्ष!

Pravin Dabholkar Tue, 02 Jul 2024-11:17 am,

Underwear Mistakes: अंडरवियर आणि त्याचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल खुलेपणाने बोलणे आवश्यत आहे. असे असले तरी अनेकजण या विषयाला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक गंभीर आजार ओढवण्याची शक्यता असते.

2019 मध्ये एका अंडरवेअर उत्पादकाने सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्यानुसार 45 टक्के लोक दोन किंवा अधिक दिवस एकच अंडरवेअर घालतात. यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त असते.

  काही पुरुष एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ तीच अंडरवेअर घालतात. तीच अंडरवेअर घातल्याने आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, असे अनेकांना वाटते पण तसे अजिबात नाही.

एकच अंडरवेअर अनेक दिवस न धुता घातल्यास तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. बहुतांशजण अंडरवेअरशी संबंधित काही चुका कधी ना कधी करतच असतात. जर तुम्ही या चुकांकडे लक्ष दिले तर तुम्ही तुमचे प्रायव्हेट पार्ट तसेच तुमचे एकंदर आरोग्य चांगले ठेवू शकाल.

अनेकजण कॉटनऐवजी इतर फॅब्रिकपासून बनवलेल्या अंडरवेअर खरेदी करता. अंडरवेअर काही दिसण्यात येणारी गोष्ट नाही. त्यामुळे त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पण असे अजिबात करु नका.  नेहमी सुती कापडाच्या अंडरवेअर वापरा.कॉटनची अंडरवेअर वापरायची नसेल कर मध्यभागी कॉटन असेल अशी अंडरवेअर निवडा. जेणेकरुन कोणत्याही प्रकारचा ओलावा की शोषून घेईल. 

कॉटन अंडरवेअर न घातल्याने यीस्ट इन्फेक्शनचा धोका वाढतो, असे 2018 मध्ये ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले गेले. पॉलिस्टर आणि सिंथेटिक कापडापासून बनवलेल्या अंडरवेअर तुमच्या प्रायव्हेट पार्टला इजा पोहोचवू शकतात. कारण हे कापड पाणी शोषत नाहीत. यामुळेच त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याचा धोका असतो. कॉटन अंडरवेअरमध्ये ओलावा शोषण्याची क्षमता असते. ज्या स्त्रिया कॉटन पॅन्टी घालतात त्यांना योनीमार्गात संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.

अनेकजण टीव्हीमध्ये पाहून किंवा जाहिरातींना भुलून लहान अंडरवेअर घालायला जातत. पण हे प्रकर्षाने टाळा. कारण असे केल्यास तुमचे प्रायव्हेट पार्ट घामाने ओले होऊन गरम होऊ शकतात. अशाने तुम्हाला जळजळ जाणवू शकते. प्रायव्हेट पार्ट्समध्ये इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे फार घट्ट किंवा खूप सैलही नाही अशी अंडरवेअर निवडावी. 

बरेच लोक अंडरवेअर धुण्यासाठी सुगंधित डिटर्जंट वापरतात. जे अत्यंत चुकीची आहे. तुमच्या प्रायव्हेट पार्टची त्वचा मऊ आणि संवेदनशील असते. त्यामुळे अंडरवेअर धुण्यासाठी सुगंधी डिटर्जंट वापरणे टाळा. कारण यामुळे जळजळ जाणवू शकते. सुगंधित डिटर्जंटमध्ये असलेल्या रसायनांमुळे जळजळ आणि खाज सुटते. त्यामुळे त्यांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करा.

अंडरवेअरच्या बदलत्या रंगाकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवे. कारण अंडरवेअरचा बदलता रंग तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या आरोग्याशी संबंधित असतो. पांढऱ्या रंगाचा स्त्राव असेल तर ते सामान्य आहे. पण हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा स्त्राव असेल तर तुम्हाला बॅक्टेरियल योनिओसिस असण्याची शक्यता आहे. 

जेव्हा योनीमध्ये बॅक्टेरियाची संख्या वाढते तेव्हा बॅक्टेरियल योनिओसिस होतो. अशावेळी स्त्राव फेसयुक्त आणि पूसारखा दिसतो. डिस्चार्जचा रंग तसेच त्यातून येणाऱ्या वासाकडे लक्ष द्या. जर स्त्रावमधून वास येत असेल तर सावध व्हा. कारण हेदेखील आजाराचे लक्षण देखील असू शकते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link