तुम्हाला वारंवार विसरण्याची सवय आहे का?; आत्ताच आहारात बदल करा

Mansi kshirsagar Sat, 10 Jun 2023-7:38 pm,

सतत विसरण्याची सवय ही काही मोठी समस्या नसली तरी एक दिवस तुम्हाला ही सवय अडचणीत आणू शकते. छोट्या- छोट्या गोष्टी किंवा अगदी पाच मिनिटांपूर्वी ठेवलीली वस्तूही तुम्ही विसरता. अशावेळी ही समस्या तुमच्यासाठी गंभीर ठरु शकते. अनेकदा शरीरात ब१२ जीवनसत्व कमी असल्यासही वारंवार विसरण्याची सवय लागते. 

शरीरात ब १२ जीवनसत्व कमी झाल्यामुळं अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकते. त्यामुळं आज ब१२ जीवनसत्व कमी झाल्यामुळं निर्माण होणाऱ्या समस्यांचा घेतलेला आढावा

आहारात ब१२ जीवनसत्वाचा अभाव असल्यास मानसिक स्वास्थ बिघडते. अनेक मानसिक आजारांची उद्भवू शकतात. यात अनेकांची स्मरणशक्ती कमी होते तर काही जण अनेक छोट्या छोट्या गोष्टी विसरु लागतात. म्हणूनच आहारात ब१२ जीवनसत्वाचा समावेश करा

ब१२ जीवनसत्वाचा अभाव असल्याच नजर कमजोर होणे, अस्पष्ट दिसणे तसंच, लहान अक्षरे वाचण्यास त्रास होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात

जीवनसत्व ब१३ची कमतरता असल्यास तुम्ही अॅनिमियासारख्या आजाराचा सामना करावा लागू शकतो. कारण अशा परिस्थितीत शरीरात लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळं रक्ताची कमतरता निर्माण होते. 

तुमच्याही हाडांमध्ये वेदना होत असतील तर वेळीच तुमच्या आहारात ब१२ जीवनसत्वांचा समावेश करा. नाहीतर पाठदुखी किंवा कबंरदुखी मागे लागू शकते. 

व्हिटॅमिन बी 12 मासे, चिकन, अंडी आणि कोळंबीमध्ये आढळते. जर तुम्ही मांसाहारी असाल तर या गोष्टी खा. शाकाहारी लोक काही प्रमाणात दही, ओटमील, सोयाबीन, ब्रोकोली आणि टोफू खाऊन ही कमतरता भरून काढू शकतात

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link