देशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन; 9 राज्य ओलांडण्यासाठी घेते 80 तास

Tue, 19 Mar 2024-3:18 pm,

अमेरिका, चीन आणि रशियानंतर जगातील चौथ्या क्रमांकाचे भारतामध्ये रेल्वे नेटवर्क आहे. भारतात दररोज 2 कोटींहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात.  

 

पण भारतात अशी एक एक्सप्रेस आहे. जी देशातील सर्वात लांबचा प्रवास करते.  तसेच या ट्रेनला शेवटच्या स्थानकावर पोहचण्यासाठी 4 दिवस लागतात. 

भारतातील सर्वात लांबचा प्रवास करणारी विवेक एक्स्प्रेस ट्रेन आहे. ही ट्रेन स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने सुरु करण्यात आली होती. 

ही ट्रेन डिब्रूगड ते कन्याकुमारी दरम्यान 4189 किलोमीटरचे अंतर कापते. ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन असून लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या बाबतीत जगात 24 व्या क्रमांकावर आहे.

ही पॅसेंजर विवेक एक्सप्रेस आसाम, नागालँड, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, केरळ मार्गे 59 स्थानकांवर थांबते असून एकूण 9 राज्यांमधून प्रवास करते. ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडणारी ही ट्रेन आहे.

दिब्रुगड-कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस (मंगळवार, शनिवार) धावते. त्यात 19 डबे आहेत. तीन एसी कोच आहेत. 6 जनरल कोच आणि 9 स्लीपर क्लास आहेत. ट्रेनमध्ये पॅन्ट्री कारही आहे.

ट्रेन क्रमांक 15905- 15906 आहे जी दोन्ही दिशेने धावते. ही ट्रेन दिब्रुगडहून संध्याकाळी 7.25 वाजता सुटते आणि सुमारे 74.35 तासांनी दुपारी 22.00 वाजता कन्याकुमारीला पोहोचते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link