Walking Benefits : दररोज 10,000 पावलं चालणं किती फायद्याचं? स्मार्टवॉचमध्ये आकडा पाहण्यापेक्षा वाचा ही माहिती

Sun, 16 Apr 2023-9:44 am,

तुम्हाला माहितीये का, दररोज ठराविक अंतर चालल्यामुळं फुफ्फुसं, हृदय आणि संपूर्ण शरीलाला मोठा फायदा होतो. त्यामुळं दररोज 10 हजार पावलं चालून तुम्ही सहजपणे डॉक्टरांपासून दूर राहू शकता.

नियमित वेगानं साधारण 10 हजार पावलं चालल्यास स्नायू मोकळे होण्यासोबतच बळकटही होतात. यामुळं हाडांचं आरोग्यही सुधारतं.

मितेन सेज फिटनेस (एमएसएफ) चे फिटनेस कोच, मितेन काकैया यांच्या माहितीनुसार आरोग्याबाबतची ध्येय्य साध्य करण्यासाठी 10 पावलं चालण्याची सवय मदत करते.

यासाठी तुम्ही काही हजार पावलांनी सुरुवात करून त्यानंतर 10 हजार पावलांचा टप्पा गाठू शकता. 10 हजार पावलं चालण्याच्या सवयीमध्ये सातत्य राखणं मात्र महत्त्वाचं.

जाणून आश्चर्य वाटेल पण, 10 हजार पावलं चालून तुम्ही वजन घटवण्यासोबतच शरीरातील 500 कॅलरी बर्न करू शकता. त्यामुळं वजन कमी करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना इथं सहज यश मिळताना दिसेल.

10 हजार पावलं म्हणजे साधारण साडेतीन ते चार किलोमीटर इतकं अंतर दररोज चालल्यास यामुळं मानसिक आरोग्यही सुरळीत राहतं. तणाव आणि नैराश्य मोठ्या फरकानं कमी होतं. त्यामुळं दररोज 10 हजार पावलं चाला आणि निरोगी राहा.

 

(वरील माहिती अभ्यासकांच्या सल्ल्यानं घेतली असूस हे त्यांचं निरिक्षण आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link