सुटलेल्या पोटामुळं Uncomfertable आहात? `हे` 5 पदार्थ वेगानं कमी करतील वजन

Fri, 09 Jun 2023-12:02 pm,

Weight Loss Diet: मुळात चुकीच्या पद्धतीनं Follow केला जाणारा डाएट प्लान सहसा फार फायद्याचा ठरतच नाही. कारण, तिथं शरीराराल गरजेच्या असणाऱ्या पोषक तत्वांचा पुरवठा सहसा केलाच जात नाही. 

Weight Loss Diet: अशा वेळी नेमकं काय करावं? पूर्णपणे डाएटच्या आहारी जायचं म्हटलं तर चवीचे पदार्थ खाण्याची हौस मागेच सोडावी लागेल याची चिंताही अनेकांनाच असते. पण, तुम्हाला माहितीये का काही चवीचे पदार्थ खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता. यातलाच एक प्रकार म्हणजे नट बटर. 

 

आरोग्यदायी स्निग्ध घटक असणारं पीनट बटर हा प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. यामुळं भूकही भागते. 

 

वजन कमी करण्याच्या Mission मध्ये तुम्हाला काजू बटरही फार मदत करतं. तंतूमय घटकांपासून प्रथिनांपर्यंत अनेक पोषक तत्वं यामध्ये असतात. त्याशिवाय झिंक, मॅग्नेशियम आणि अधिक प्रमाणांत विटामिन्सही यामध्ये असतात. 

 

मेंदू आणि हृदयासाठी अकरोडचं बटर कायम फायद्याचं ठरतं. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात. यामध्ये असणारी पोषक तत्वं आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. 

 

तिळापासून तयार करण्यात आलेल्या बटरच्या सेवनामुळं पोट रिकामं भासत नाही, ज्यामुळं नको त्या वेळी नको ते पदार्थ खाणं टाळलं जातं. शिवाय शरीराला प्रचंड उर्जाही मिळते. 

 

कमीत कमी प्रमाणात आलमंड बटर खाल्यास त्याचे वजन कमी करण्यास बरेच फायदे होतात. यामुळं रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यातही मदत होते. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link