Rules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला `या` गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...

Wed, 15 Nov 2023-9:52 pm,

तज्ज्ञांनुसार दुधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणून एक ग्लास दूध कायम सेवन केलं जातं. दूध आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. अशात दूध कसं प्यावे आणि त्याचं सेवन कसं करु नये याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होण्याची भीती असते. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पोटात आम्लपित्त, पेटके आणि उलट्या यांसारख्या समस्याही उद्भवतात. 

कोणते दूध शरीराला अधिक पोषक आहे तुम्हाला माहिती आहे का? तज्ज्ञांच्या मते, दूध गरम केल्याने त्यातील अनेक पोषक घटक नष्ट होतात, त्यामुळे कच्चे दूध अधिक चांगल आहे. पण त्याचं जसं फायदे आहेत, त्याचप्रमाणे तोटेही आहेत. कच्चे दूध प्यायल्याने त्यातील बॅक्टेरिया आतड्यात जमा होऊ शकतात. 

 टरबूज, लिंबूवर्गीय आणि केळीसारख्या काही फळांसह दूध कधीही घेऊ नयेत. समोसा, पराठा, खिचडी अशा खारट पदार्थांसोबत कधीही चुकूनही दूधाचं सेवन करु नयेत. दुधात मीठ घालणे किंवा खारट पदार्थांसोबत दूध पिल्यामुळे सोडियम आणि लैक्टोज यांच्यात प्रतिक्रिया निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचा रक्तदाब वाढून हृदयासारख्या आजारांना चालना मिळते. 

रोज रात्री एक ग्लास कोमट दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गरम दूध प्यायल्याने पुढील दिवसाची ऊर्जा टिकून राहण्यास फायदे होता. याशिवाय स्नायूंचा विकास होण्यास तुम्हाला मदत मिळते. 

तर तुम्हाला माहिती आहे की, कावीळ, जुलाब आणि गॅसचा त्रास झाला असेल तर दूध पिणं टाळावं. 

 

हळद मिसळून दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. हळदीचं दूध घेल्यास तुमची पचनक्रिया सुधारते. हात पायांची सूज कमी होण्यास मदत होते. शिवाय ताप आणि सर्दी खोकल्या झाल्या असल्यास हळदीचं दूध फायदेशीर आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link