बर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा...प्रेग्नेंसी रोखण्यासाठी काय करायच्या महिला?

Thu, 13 Jul 2023-2:45 pm,

या विचित्र आणि भयानक पद्धतीमुळे असंख्य महिलांनी आपला जीव गमावला आहे. अगदी महिलांना गंभीर आजारही झाले आहेत. या सर्व पद्धती शास्त्रीयदृष्ट्या योग असल्याचा कुठलाही पुरावा आजही नाही. फक्त परंपरेने आणि एकमेकांना सांगून गैरसमजामुळे 8 भयानक पद्धती सर्रास वापरल्या जात होत्या. 

इटलीची प्रसिद्ध साहसी आणि लेखिका कॅसानोव्हा यांनी सांगितलं की, शेकडो वर्षांपूर्वी पुरुष सेक्सच्या दरम्यान स्त्रियांना प्रायव्हेट पार्टमध्ये लिंबू ठेवायला सांगायचे. त्यांचा मते लिंबामुळे गर्भधारणा टाळता येतं होती. 

चीनमध्ये महिला प्रेग्नेंसी टाळण्यासाठी पाराचे सेवन करत होत्या. मात्र धक्कादायक या पाराच्या वापरामुळे अनेक महिलांनी आपला जीव गमावला आहे. 

पूर्वी गर्भधारणा होऊ नयेत म्हणून महिला सेक्सच्या दरम्यान गळ्यात एका विशिष्ट प्रकारचा चेंडू घालत होत्या. त्या चेंडूमुळे प्रेग्नेंसी टळायची असा समज होता.

 

गर्भधारणा होऊ नयेत म्हणून महिला शारीरिक संबंधाच्या वेळी व्हिनेगर लावलेला स्पंज आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवायच्या. पण यामुळे महिलांना प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन होऊन गंभीर आजार व्हायचा. 

हो अगदी, बरोबर लाडकाचा तुकडा प्रेग्नेंसी टाळण्यासाठी शेकडो वर्षांपू्र्वी महिला वापरत होत्या. सेक्सच्या दरम्यान लाडकडा एक तुकडा महिला आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवायच्या जेणे करुन वीर्य आत जाऊ नये. 

मीडिया रिपोर्टनुसार पूर्वी भारतासह अनेक देशात सेक्सनंतर महिलांनी प्रायव्हेट पार्टमध्ये स्टीम घेतल्यास शुक्राणूचा नाश होतो. जेणेकरुन महिला गर्भवती होत नाही. 

प्राचीन काळी भूमध्य प्रदेशात राहणारे लोक स्त्रियांची गर्भधारणा रोखण्यासाठी एक विशेष पद्धत शोधल्याचा दावा करतात. झाडांच्या पालापाचोळ्याचा रस काढून महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला जायचा. अनेक वेळा तो खाल्लाही जात होतो. पण यामुळे महिलांना गंभीर आजार झालेत. 

सर्वात विचित्र, धोकादायक आणि घृणास्पद पद्धत म्हणजे मगरीचे मलमूत्र वापरणे. प्राचीन इजिप्तमध्ये गर्भधारणा टाळण्यासाठी मगरीच्या मलमूत्रापासून तयार केलेली पेस्ट महिला आपल्या प्रायव्हेट पार्टवर लावायच्या. ज्यामुळे त्या प्रेग्नेंट होत नव्हत्या असा दावा करण्यात आला आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link