आपल्या कोकणात इतके सुंदर लोकेशन असताना कशाला जायचं परदेशात? अप्रतिम फोटो पाहून प्रेमात पडाल

वनिता कांबळे Wed, 03 Jul 2024-11:36 pm,

 कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान. कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालते. 

समुद्र किनारी होणारी मासेमारी, किनाऱ्यावर असलेली गाव, इथली संस्कृती तसेच अनेक ठिकाणी असलेली लहान लहान बेटं... इथं असलेली सुंदर लोकेशन परदेशातही पहायला मिळणार नाहीत. 

कोकणात अनेक ठिकाणी नदी आणि समुद्रचा संगम होतो. अशा ठिकाणी बॅक वॉटर मध्य नौका विहार करण्याचा अनुभव तर अविस्मरणीय असा आहे.

फक्त समुद्र किनारेच नाही तर गर्द झाडी, डोंगर दऱ्या देखील कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर घालतात. 

शांत, निवांत आणि गर्दी पासून दूर असलेले समुद्र किनारे पाहून पर्यटक हरखून जातात. 

महाराष्ट्र टूरीजमने कोकणातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून आयुष्यात एकदा तरी कोकणात फिरायला जायचं असं फोटो पाहणाऱ्यांच्या मनात येईल. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link