1300 वर्षांपूर्वी दगडात खुपसलेली तलवार गायब, युरोपमध्ये घबराट! अमिताभ यांचा `अजूबा` नक्कीच आठवेल

Fri, 05 Jul 2024-3:24 pm,

Magic Sword : अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'अजूबा' चित्रपटानं एक काळ गाजवला. या चित्रपटाच्या पात्रांपासून त्यात दाखवण्यात आलेल्या दृश्यांपर्यंत अनेक गोष्टी इतक्या कमाल होत्या की आजही हा चित्रपट आवडीनं पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही. 

अशाच या चित्रपटाप्रमाणं एक दंतकथा होऊन गेली, ज्या कथेची साक्ष देणारी आणि हजारो वर्षांपासून एका दगडात खुपसण्यात आलेली जादुई तलवार एकाएकी दिसेनाशी झाली आहे. कधीही न खंड पावणारी आणि जगातील सर्वात धारदार तलवार म्हणून ओळख असणाऱ्या या तलवारीचं आणखी एक नाव म्हणजे, 'डुरंडल' किंवा फ्रेंच एक्सकॅलिबर. 

 

आर्थर राजानं खडकातून ही तलवार काढली होती असं म्हणत हा राजा ब्रिटनचा सत्यवादी आणि सत्यवचनी राजा होता असेही संदर्भ आढळतात. टेलिग्राफच्या वृत्तानुसार किंवजंतीच्या संदर्भांआधारे ही तलवार एका देवदूतानं आठव्या शतकामध्ये पवित्र रोमन सम्राट शारलेमेनला सुपूर्द केली होती. 

सध्याच्या घडीला अतिशय रहस्यमयीरित्या ही तलवार गायब झाली असल्यामुळं युरोपात एकच भीतीची लाट पाहायला मिळत आहे. स्थानिकांच्या मते ही तलवार चोरीला गेली असावी. मोठ्या कातळातून ही तलवार बाहेर खेचून काढण्यात आली असावी. आश्चर्याची बाब म्हणजे जमिनीपासून साधारण 100 फूट उंचीवर असणारी ही तलवार आता तिथं नसल्यामुळं ती नेमकी कशी बाहेर काढली हाच प्रश्न पडत आहे. 

11 व्या शतकातील एका कवितेमध्ये या तलवारीचा उल्लेख 'जादुई क्षमता' असणारी तलवार असा आढळत असून, हे फ्रेंच संस्कृतीतील सर्वात सुरुवातीच्या काळातील साहित्य असल्याचं सांगण्यात येतं. 'द साँग ऑफ रोलँड' असं या पुस्तकाचं नाव. या पुस्तकाची एकमात्र प्रत्यक्ष प्रत ऑक्सफर्डमध्ये बोडलियन ग्रंथालयात संग्रहित करून ठेवण्यात आली आहे. 

या तलवारीचे अनेक गुणविशेष सांगितले जातात. जिथं या तलवारीच्या एका घावात कातळाचेही तुकडे होतात अशी असाधारण क्षमता असल्याचं सांगण्यात येतं. त्यामध्ये सेंट पीटर यांचा दात, सेंट बेसिल यांचं रक्त आणि सेंट डेनिस यांचे केस चिकटल्याचं म्हटलं जातं. राजा शारलेमेन यानं रोलांड या आपल्या शूरवीर योद्ध्याला ही तलवार भेट स्वरुपात दिली होती. 

आपल्या जीवनातील अखेरच्या काही दिवसांमध्ये रोलांडनं ही तलवार नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण, ही तलवार तुटलीही नाही आणि तिची धारही कमी झाली नाही. शेवटी रोलांडनं ती तलवार फेकून दिली. ज्यानंतर हवेत उडालेली ही तलवार कैक हजार किलोमीटर दूर असणाऱ्या रोकामाडोरमधील एका दगडी पर्वतामध्ये रुतली आणि तेव्हापासून ती त्याच स्थितीत होती. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link