तुमच्या वार्षिक In Hand Salary पेक्षा जास्त आहे Dolly Chaiwala चं दिवसाचं मानधन; आकडा पाहाच

Swapnil Ghangale Sat, 07 Sep 2024-2:27 pm,

तुम्ही विचारही करु शकत नाही एवढी आहे या नागपूरमधील प्रसिद्ध डॉली चायवाल्याची एका कार्यक्रमाची फी! जाणून घेऊयात तो कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नक्की काय काय मागण्या करतो याबद्दल....

इंटरनेट वापरणाऱ्या भारतीयाला नागपूरचा डॉली चायवाला ठाऊक नाही हे शक्यच नाही. 

टपरीवर चहा बनवण्याच्या आपल्या हटके स्टाइलमुळे नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चेत असलेला डॉली चायवाला पुन्हा चर्चेत आलाय एका वेगळ्याच कारणाने.

खरं तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यासोबत झळकलेल्या एका व्हिडीओमुळे डॉली चायवाल्याची कॉलर अधिकच टाईट झाली.

डॉली चायवाला थेट जगातील सर्वात नावाजलेल्या व्यक्तींपैकी एकाला चहा पाजताना दिसला अन् त्याचं नशीबच पालटलं आहे. 

बिल गेट्स यांच्यासोबत झळकल्यानंतर डॉली चायवाला परदेशातील अनेक लोकेशन्सवर जाऊन आला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर या दौऱ्यांचे व्हिडीओ आणि फोटोही पोस्ट केलेत.

 

डॉली चायवालाने मागील काही महिन्यात अनेकदा दुबईचा दौरा केला आहे. त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहल्यावर हे सहज समजतं.

 

नागपूरमध्ये एका हातगाडीवर चहा विकणारा डॉली चायवाल अगदी मालदीवलाही जाऊन आला आहे.

 

डॉली चायवाल्याची वट एवढी वाढली आहे की तो आता सुरक्षारक्षक घेऊन घराबाहेर पडतो.

मात्र बिल गेट्स यांच्या परीस स्पर्शाने डॉली चायवाल्याची किंमत चांगलीच वधारली आहे. त्याला आता जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून आमंत्रण, निमंत्रण येतात. मात्र यासाठी तो भरमसाठ पैसे फी म्हणून घेतो. हे पैसे किती याचा खुलासा नुकताच झाला आहे.

डॉली चायवाल्यासंदर्भातील एक थक्क करणारा खुलासा कुवैतच्या एका व्हॉगरलने केला आहे. डिजीटल कंटेट क्रिएटर असलेल्या तायब फारुद्दनबरोबर बोलताना ए. के. फूड व्हॉग नावाने चॅनेल चालवणाऱ्या व्हॉगरने डॉली चायवाला एका भेटीसाठी किती पैसे घेतो हे सांगितलं आहे.

 

साध्या टपरीवर चाहा विकून सोशल मीडिया स्टार झालेला डॉली चायवाला एका कार्यक्रमासाठी आता तब्बल 5 लाख रुपये घेतो असं ए. के. फूड व्हॉग चालवणाऱ्याने सांगितलं आहे. 

 

इतकेच नाही ज्याप्रमाणे डॉली चायवाल्याची चहा बनवण्याची पद्धत हटके आहे तशाच त्याच्या अशा कार्यक्रमासंदर्भातील मागण्याही हटके आहेत. डॉली चायवाला अशा कार्यक्रमांना जातो तेव्हा किमान 4 स्टार ते 5 स्टार हॉटेलमध्येच राहतो. याचा खर्चही आयोजकांनी करणं अपेक्षित असतं.

 

"मला डॉली चायवालाला कुवैतला बोलवायचं होतं. मात्र या व्यक्तीच्या मागण्या फारच आहेत. त्या ऐकून मला स्वत:च्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न पडला. त्याच्या मागण्या ऐकून खरंच याला हे सारं पाहिजे का असा प्रश्न मला पडला," असं ए. के. फूड व्हॉग चालवणाऱ्याने सांगितलं.

 

"इव्हेंटबद्दल विचारण्यासाठी फोन केला तेव्हा डॉली चायवाला माझ्याशी बोलत नव्हता. त्याचा मॅनेजर माझ्याशी बोलत होता. त्याचा स्वत:चा एक मॅनेजर आहे," असंही आश्चर्यचकित होऊन ए. के. फूड व्हॉग चालवणाऱ्याने सांगितलं मुलाखतीत म्हटलं. 

 

तसेच या व्यक्तीने पुढे सांगताना, "कार्यक्रमांना डॉली चायवाला एकटा येत नाही. त्याच्यासोबत एक ते दोन जण येतात. त्यांची सगळी सोयही आयोजकांनी करणं अपेक्षित असतं," अशी माहिती दिली.

 

म्हणजेच डॉली चायवाला एका कार्यक्रासाठी जितके पैसे घेतो तितकी अनेक सर्वसामान्य भारतीयांची वर्षाची इन हॅण्ड सॅलरीही नाही असं म्हटल्यासं चुकीचं ठरणार नाही. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link