राज्य सरकारचा एसटी कामगारांना शेवटचा इशारा; कारवाईसाठी प्रशासकीय हालचाली सुरू
अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारने कर्मचा-यांना गंभीर इशारा दिला आहे. आज कामावर हजर न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. त्यासाठी आता प्रशासनाने तयारी सुरू केलीय.
मुंबई : अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारने कर्मचा-यांना गंभीर इशारा दिला आहे. आज कामावर हजर न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. त्यासाठी आता प्रशासनाने तयारी सुरू केलीय.
महिन्याभरापासून एसटीचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मुद्द्यावर संपकरी ठाम आहेत. परंतु संप थांबवण्यासाठी आता राज्य सरकारने कडक पावले उचलायला सुरूवात केली आहे.
राज्य सरकारने कामगारांना आज कामावर हजर न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन त्यानंतर त्याची सुनावणी घेण्यात येईल. या सुनावणीत संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
आम्हाला अल्टीमेटम द्यायला आम्ही नक्षलवादी किंवा ड्रग्स विक्री करणारे नाही आहोत, असं म्हणत पुण्यातील एसटी कर्मचा-यांनी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलंय.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज कर्मचारी हजर झाले नाहीत तर कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय..मात्र, आम्ही कोणत्याही कारवाईला सामोरं जायला तयार आहोत असं कामगारांचं म्हणणं आहे.