पुणे : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर निवडणुकीत आम्हाला जी मते मिळाली. त्या मिळलेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत. ते तिघे होते आणि आम्ही एकटे त्यांच्याविरोधात लढलो. एकटे लढूनही आम्हाला इतकी मते मिळाली आहेत. त्यामुळे 2024 ला ही जागा आम्ही निश्चित जिंकू, असा दावा फडणवीस यांनी केला.


राज ठाकरे ( Raj Thackeray ) अयोध्येला जाणार आहेत. तर, त्यात गैर असं काय आहे? प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घ्यायला कुणीही जाऊ शकतं, असं ते म्हणाले. 


संजय राऊत ( Sanjay Raut ) दिवसभर बोलत राहतात. ते मोकळे आहेत, त्यांना काही काम नाही,  पण आम्हाला कामं आहेत, ते खूपच फसस्टेड व्यक्ती, असल्याचा टोला त्यांनी लगावला.