Crime News : दीड महिन्यात दुसरा राजकीय खून; तळेगावमध्ये भर दिवसा हत्येचा थरार
पुण्याच्या मावळ तालुक्यात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या झाली आहे. मावळात मागच्या दीड महिन्यातला दुसरा राजकीय खून झाला आहे. तळेगाव नगरपरिषदेत भर दिवसा खुनी हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
Pune Crime News : पुण्यातील तळेगावमध्ये भर दिवसा हत्येचा थरार पहायला मिळाला. जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली आहे. तळेगाव नगरपरिषदेच्या आवारात हा भर दिवसा हा खुनी हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मावळात तालुक्यात मागील दीड महिन्यातील राजकीय वादातून हत्या झाल्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे राजयकीय गुन्हेगारी वाढल्याचे दिसत आहे.
किशोर आवारे हे पुणे जिल्हयाचील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आवारे यांच्यावर तळेगाव नगर परिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंधीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत त्यांना सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली येत आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावरती खुनी हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला तर दोघाजणांनी कोयत्याने वार केले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काही वेळ तेथेच थांबून होते. यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर स्थानिकांनी आवारे यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेले. मात्र, गंभीर जखमी असल्याने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात अआली आहेत. राज्यकीय वैमनस्यातूनच हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
भाजपाच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्षावर हल्ला
भाजपाच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप सिंग यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. जनसंपर्क कार्यालयाजवळ त्यांची कार उभी असताना अज्ञातांनी हा हल्ला केला. ही दगडफेक सीसीटीव्हीत कैद झालीय. याआधीही कार्यालय परिसरातले भाजपाचे बॅनर अज्ञातांनी फोडले होते.
बाजार समिती निवडणुकीतील ठाकरे गटाचे उमेदवारावर हल्ला
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील ठाकरे गटाचे उमेदवार दत्ता बोरेकर यांच्यावर हल्ला झाला होता. सोमवारी मध्यरात्री एका अज्ञात इसमाने त्यांच्या दुचाकीसमोर बोलेरो टेम्पो आडवा घालून, बोरेकर यांना दुचाकीसह फरफटत नेलं होते.