मुंबई-पुणे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, महामार्गावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद
आज तुम्ही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
मुंबई : आज तुम्ही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक आज दुपारी १२ ते २ दरम्यान अशी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ओव्हरहेड गँट्रिज बसवण्यासाठी ही वाहतूक बंद असेल. अनेकणांना याबद्दल माहिती नाही आहे. त्यामुळे ऐनवेळी खोळंबा होण्याचीही शक्यता आहे. रसायनी आणि माडप या ठिकाणी गँट्रिजचं काम केलं जाणार असल्याने ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवण्यात येणार असल्याची माहीती वाहतूक विभागाने केली आहे.
वाहनांची संख्या जास्त
मुंबई पुणे हायवे वरून नियमित प्रवाशी वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरु शकते. दोन तासाचा वेळ दिला असला तरी मोठ्या प्रमाणातील वाहतूक पाहता हे काम लवकरात लवकर उरकणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.