`ती` चहा पित असताना तो आला अन् थेट तिच्या मांडीवर बसला, नंतर जे झालं...
राज्यात मुली, महिलांची छेड काढणे तसेच विनयभंगाची प्रकरणे सुरूच आहेत. रस्त्याने जाणाऱ्या तरुणी, महिलांना शिट्ट्या वाजवणे, भररस्त्यात छेड काढणे, असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीये.
पुणे : राज्यात मुली, महिलांची छेड काढणे तसेच विनयभंगाची प्रकरणे सुरूच आहेत. रस्त्याने जाणाऱ्या तरुणी, महिलांना शिट्ट्या वाजवणे, भररस्त्यात छेड काढणे, असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीये. पुण्यात देखील अशा रोडरोमियोंचा त्रास महिला/तरुणींना सहन करावा लागतोय. रोड रोमियोंची मजल चहा पित बसलेल्या तरुणींच्या मांडीवर जाऊन बसण्यापर्यंत गेली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याअंतर्गत असाच प्रकार समोर आला आहे.
पुण्यात तरुणी आणि महिलांचे छेड काढण्याचे सत्र सुरूच आहे. रोड रोमियोंना कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न पडू लागला आहे. शहरातील शिवणे परिसरातील 30 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली की, 26 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता त्या आंबेगाव येथील स्टॉलवर चहा पित होत्या. त्यावेळी काही रोड रोमियो शिट्ट्या वाजवत तेथे आले.
संबधित महिला त्यांच्या मैत्रिणीसोबत चहा पित असताना रोड रोमियो महिलेच्या मांडीवर येऊ बसले. तसेच पोटाल हात लावून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला ढकलले, आणि जाब विचारला तर आरोपीने शिविगाळ करीत तेथून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी सविस्तर चौकशी करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.