PUNE | पुणेकरांसाठी महत्वाची अपडेट; पाणीकपातीचा आजच होणार फैसला
जून संपत आला, तरी पावसाची ओढ कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीने तळ गाठल्याने पुणेकरांना 1 जुलैपासून पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पुणेकरांना दिवसाआड पाणी आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे
सागर आव्हाड, पुणे : जून संपत आला, तरी पावसाची ओढ कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीने तळ गाठल्याने पुणेकरांना 1 जुलैपासून पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पुणेकरांना दिवसाआड पाणी आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहराला फक्त दीड महिना पुरेल एवढेच पाणी धरणसाखळीत शिल्लक आहे. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे.
शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यासाठी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह आज तातडीची बैठक बोलावली आहे.
धरणांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेऊन बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, 2015 मध्येही अशा प्रकारची पाणीकपातीची कुऱ्हाड पुणेकरांवर कोसळली होती. तसेच नियोजन आता केले जात आहे.