`झी 24 तास` इम्पॅक्ट | पुण्यातील जमिनी NA घोटाळ्याप्रकरणी, पोलीस व नोंदणी निरीक्षक ऍक्शनमध्ये
Pune | बोगस एनए ऑर्डर व बांधकाम परवानगीच्या सहाय्याने अनधिकृत सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे
सागर आव्हाड, पुणे : बोगस एनए ऑर्डर व बांधकाम परवानगीच्या सहाय्याने अनधिकृत सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सात प्रकरणांमध्ये तीन व्यक्तींवर हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध व्यवसाय करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत. 'झी २४ तास'ने हा घोटाळा उघडकीस आणला होता.
मागील दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणीस बंद असताना ही बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले होते. याप्रकरणाची मुद्रांक शुल्क विभागाने सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयांची तपासणी सुरू केली आहे. दरम्यान या विरोधात विभागाकडून पोलीस कठोर कारवाई करणार असून, आढळून आलेल्या प्रकरणातील प्रत्येक दस्तावर असलेल्या सदनिका विक्री करणार आणि खरेदी करणारे यांची नावे पोलिसांना कळविली जाणार आहे.
बनावट NA प्रकरणात एक वकील 21 जणांना अटक करण्यात आली असून, इतर एजंट सब्रजिस्टर पोलिसांनी नोंदणी विभागाच्या रडार आहेत.
भरती हवेली क्रमांक 27 मधील सब्रजिस्टर विरोधात निलंबनाचा प्रस्ताव मंत्रालयात दाखल करण्यात आला असून, तक्रारदार रोहन सुरवसे यांच्या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
Fake NA order in Pune : फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करताना मूळ दस्त तपासूनच रजिस्ट्रेशन केले जाते. मात्र पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर आणि भोगवटापत्र तयार करून अनेक फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दलाल आणि सरकारी बाबूंनी केलेल्या या बोगस दस्त नोंदणीचा भांडाफोड 'झी 24 तास'ने केला होता. (Fake NA order, registration of flats by making occupancy certificate in Pune)
बनावट एनए ऑर्डर आणि बनावट भोगवटापत्र तयार करून शेकडो फ्लॅट्सची नोंदणी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला. त्यामुळे महसूल प्रशासनाची झोप उडाली. (Pune Housing Society Scam ) अनधिकृत बांधकामातील फ्लॅट्सची नोंदणी गेल्या वर्षापासून पूर्णपर्ण बंद करण्यात आली आहे. मात्र उपनगराच्या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं झाली असल्याचे समोर आले.
अशा बांधकामातील दस्तांची नोंदणी बंद झाल्यामुळे काही हजार फ्लॅट्स पडून आहेत. एवढंच नाही तर अशा अनधिकृत बांधकामांमध्ये राजकीय क्षेत्रातील काही बड्या धेंडांचे पैसेही अडकून पडले आहेत. मात्र दलाल आणि सरकारी बाबूंनी यातून पळवाट काढत बनावट एनए ऑर्डर आणि बनावट भोगवटापत्राच्या आधारे अनेक फ्लॅट्सची दस्तनोंदणी करून घेतली आहे. विशेष म्हणजे यातल्या 67 बनावट एनए ऑर्डर्स एका बड्या IPS अधिका-याच्या नावानं आहेत. तर 37 बनावट भोगवटा पत्र महापालिकेच्या नावानं आहेत.
घोटाळेबाजांचा प्रताप इथवरच थांबलेला नाही. त्यांनी चक्क विभागीय आयुक्त सौरभ राव आणि तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक एस. चोक्कलिंगम यांना प्रांताधिकारी म्हणून दाखवत त्यांच्या खोट्या सह्या करून बनावट एनए ऑर्डर तयार केल्या. त्यानंतर दुय्यम निबंधकांना हातीशी धरत सदनिकांच्या नोंदणी करण्याचा सपाटा लावला.
बोगस दस्तनोंदणीचा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आलीय. मात्र प्रशासकीय सेवेतील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून या ऑर्डर तयार करण्यात आल्यामुळे प्रशासकीय पातळीवरदेखील कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
- Edited by Tushar Sonawane