Pune Mumbai Express Highway: 2022 हे वर्ष संपूण येत्या तीन दिवसानंतर नवीन वर्षाला सुरूवात होणार आहे. हे नवीन सुखाचे जावे यासाठी सर्वांचे प्रयत्न असणार. याचपारर्श्वभूमीवर हायवेवर सुसाट वेगाने वाहन चालवतात त्यांच्यावर आता आरटीओ नजर ठेवून असणार आहेय. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर (Pune Mumbai Express Highway) सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किमी तर अवजड वाहनांना ताशी 80 किमीची मर्यादा दिली आहे. तरीही चालक वेग मर्यादेचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहे. या वाहनचालकांना चाप बसण्यासाठी आरटीओ (RTO) कडून मोहीम राबविण्यात येत आहे.


त्यासाठी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर ठिकठिकाणी स्पीडगन लावण्यात आल्या आहेत. 1 डिसेंबर पासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या एक महिन्यात पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर सर्वात जास्त स्पीड हा ताशी 180 किलोमीटर इतका मोजण्यात आला आहे. त्या खालोखाल ताशी 160 किलोमीटर आणि ताशी 142 किलोमीटर इतका मोजण्यात आला आहे. सर्वाधिक स्पीड असणाऱ्या गाड्यांमध्ये सर्व गाड्या या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांना ऑनलाईन पद्धतीने दंड पाठविण्यात येत आहे. परंतु प्रत्येक गाडीवर आरटीओची करडी नजर असल्याने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर प्रवास करताना आता वेगमर्यादा पाळणे अनिवार्य असणार आहे.


वाचा : PM Narendra Modi यांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल 


मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. या वेगवान रस्त्यावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्याचबरोबर अवजड आणि इतर वाहनांकडून लेन  कटिंग केली जाते. त्याचबरोबर इतर वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. या कारणाने अपघाताला एक प्रकारे निमंत्रण दिले जाते. काही दिवसांपूर्वी बोर घाटात अशाच प्रकारे भीषण अपघात घडला होता. दररोज लहान-मोठे अपघात द्रुतगती महामार्गावर होतात. यामुळे अनेकांचे नाहक बळी जातात. या सर्व दृष्टिकोनातून आरटीओ, वाहतूक आणि महामार्ग पोलिसांकडून सातत्याने जनजागृती आणि प्रबोधन केले जाते. तरीसुद्धा वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. या सर्व दृष्टिकोनातून परिवहन विभागाकडून भरारी पथकाच्या माध्यमातून नुकतीच मोहीम राबवण्यात आली. 1 हजार 16 वाहनांवर कारवाई करण्यात आली.वेगाने वाहने चालविणे, लेन कटिंग, सिटबेल्ट, प्रवेश निषेध असताना प्रवेश करणे, मोबाईल वर बोलणे,वैध कागदपत्रे नसने, ओव्हरलोड, क्षमतेपेक्षा जास्त मालवाहू नेणे अशा वाहनचालकांवर आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला.