पुणे : राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात काल हनुमान जंयती साजरी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदिरात महाआरती केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे संजय राऊत यांनी मस्जिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा यावरून राज ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. तसेच, राज ठाकरे यांचा उल्लेख 'नकली ओवेसी' असा केला होता. 


थोड्याच वेळात राज ठाकरे पुण्यात पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी ते नेमके कोणावर निशाणा साधणार आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपांना काय उत्तर देणार आणि कोणती राज गर्जना करणार याकडे मनसैनिकांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिलं आहे.