पुणे : मोबाईल स्क्रिन असो किंवा रस्त्याला लागलेले मोठ मोठे होर्डिग्स जाहिराती प्रत्येक ठिकाणी आहेत. आपण जाहिरातींनी नेहमीच घेरलेले असतो. लोकं जााहिरातींमध्ये बहुतेक वेळा सेल आणि डिस्काउंटवर नजर ठेवतात. परंतु लोकांच्या नजरेत सध्या अशी जाहिरात पडली की प्रत्येक पाहणारा चक्रावून जातोय. कारण आतापर्यंत 2,3, किंवा 4 BHK च्या फ्लॅटच्या जाहिराती आपण बघितल्या असतील. परंतु तुम्ही 0.25 BHK ची जाहिरात कधी बघितल्या आहेत का? सध्या ही जाहिरात सोशलमीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्यातील पुणे जिल्ह्यात हे होर्डिग लावण्यात आले आहे. या होर्डिग वर 0.25 BHK फ्लॅटची जाहिरात देण्यात आली आहे. ही जाहिरात सोशलमीडियावर प्रचंड वायरल होत आहे. सगळ्यांना एकच प्रश्न पडतोय की, 0.25 BHK म्हणजे नक्की किती?  



सोशलमीडियावर वायरल होणाऱ्या या पोस्टवर असंख्य युजर्स मजेशीर कमेंट करीत आहेत. 


होर्डिगवर लिहलंय की, पुण्यात पहिल्यांदा 0.25 BHK फ्लॅट घेऊन आलो आहोत. त्याखाली 2.75, 2.25 आणि 2 BHK आणि निओ कॉस्मोपॉलिटन (neo cosmopolitan) असे लिहले आहे. कॅब्रिज डिक्शनरीनुसार जगातील विविध ठिकाणचे लोक एका ठिकाणी वास्तव्यास असणे म्हणजे कॉस्मोपॉलिटन होय. आता निओ (Neo)म्हणजेच नवे होय. हे दोघे शब्द मिळून जाहिरातीत निओ कॉस्मोपॉलिटन लिहण्यात आले आहे. आता जाहिरातदाराला यातून काय सांगायचेय हे तुम्हीच सांगा.