Pune News:  भोरमध्ये जनाईदेवी आणि रामनवमीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या यात्रेला गालबोट लागल्याचं दिसतंय. पुण्याच्या भोरमध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान, शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला बैलगाडा धडकल्यानं त्यांचा जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विष्णू गेनबा भोमे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याची घटना घडली आहे. बैलगाड्याची धडक बसल्यान भोमे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. बैलगाडीने धडक दिल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


भोरमध्ये बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विष्णू गेनबा भोमे (वय ६५) शर्यत पाहत असताना बैलगाडी अंगावर येऊन जोरदार धडक बसली. यात भोमे यांच्या डोक्याला आणि छातीला जोरदार मार लागला होता. यावेळी तात्काळ भोमे यांना उपचारासाठी पुणे येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


भोरची ग्रामदेवता जनाईदेवी आणि रामनवमीच्या उत्सवानिमित्त सोमवारी एसटी स्टँडजवळील नवलाई माता मंदिराच्या समोरील शेतामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. सेमीफायनलची बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा गर्दीत घुसला आणि ही दुर्घटना घडली. विष्णू भोमे यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. त्यांना त्वरित पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.


दरम्यान गेल्या काळामध्ये बैलगाडा शर्यत ही छंद म्हणून भरवल्या जात होत्या मात्र सध्याच्या काळात बैलगाडा शर्यत व्यवसाय म्हणून केली जात असल्याच समोर आलं आहे. तर बैलगाडा शर्यतीसाठी गावोगावातील तरुण वर्ग पूर्णता आहारी गेला असून बैलगाडा शर्यतीला कामधंदा सोडून तरुण जात असल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे जाणकार व्यक्तींकडून बोललं जातंय.