पुणे : बारामतीत एका 50 वर्षीय महिलेचा खून केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन भावंडांना अटक केली आहे.  या महिलेचे आरोपीच्या वडिलांसोबत संबंध होते, असे पोलिसांनी सांगितले. बारामतीतत राहणाऱ्या स्वाती आगवणे (50) हिच्या हत्येच्या आरोपावरून बारामती शहर पोलीसांनी मंगळवारी रुषिकेश फडतरे (34) आणि त्यांची बहीण अनुजा (33 ) यांना अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 नोव्हेंबरच्या रात्री दोन्ही भावंडांनी वडील प्रमोद फडतरे (63) यांना स्वातीसोबत पकडले. वादानंतर भावंडांनी स्वाती आणि वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, काठीने केलेला हा वार स्वातीसाठी जीवघेणा होता.


त्यानंतर भावंडांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला जाऊन त्यांना सांगितले की, वादानंतर महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासणीत नाकातून रक्त येत असल्याचे आढळून आलेल्या डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जाऊन शवविच्छेदन करण्यास सांगितले.


दरम्यान, महिलेच्या मुलाने आणि मुलीने डॉक्टरांकडे जाऊन आईच्या मृत्यूचे कारण विचारले. डॉक्टरांनी त्यांना पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहण्यास सांगितले. परंतू, मृतदेह शवविच्छेदनासाठी न नेता फडतरे भावंडांनी संशयास्पद पद्धतीने महिलेचा अंत्यसंस्कार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


हाणामारीमुळे काही जखमी झालेल्या फडतरे भावंडांच्या वडिलांना उपचार सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे ते उपचार घेत होते.


बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील महाडिक म्हणाले, ''आम्हाला एका महिलेचा संशयास्पद मृत्यू तसेच तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले अशी माहिती मिळाली आहे. परंतु मृतदेह नसल्यामुळे आणि साक्षीदार नसल्याने आम्हाला अधिक तपास करणे कठीण जात होते.


एक एक करून आम्ही सर्व लोकांना आमच्या पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावू लागलो. दरम्यान, त्या भावंडांच्या वडिलांनी, डॉक्टरांना घटनाक्रमाबद्दल सांगितले.  त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला या घटनेची आम्हाला माहिती दिली.


 आम्ही रुषिकेश आणि अनुजा यांना अटक केली असून दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.