पुरूषांसाठी लग्न करण्याचे ५ योग्य संकेत
आपण अशा काही संकेतांबद्दल चर्चा करुया ज्यातून आपल्याला कळू शकेल की हीच लग्नाची योग्य वेळ आहे.
मुंबई : कोणताही मनुष्य काही ठराविक काळापर्यंतच सिंगल राहणं पसंत करतो. आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा स्थिरता, जबाबदारीबद्दल विचार सुरू होतो. इतरांप्रमाणे आपलं पारिवारीक आयुष्य असाव असं वाटू लागतं पण नेमकं काय कराव याबद्दल भ्रम असतो. आपण अशा काही संकेतांबद्दल चर्चा करुया ज्यातून आपल्याला कळू शकेल की हीच लग्नाची योग्य वेळ आहे.
स्थिरतेच्या शोधात
तुम्ही आपल्या आयुष्यात खूप आनंदी क्षण जगला असाल. याबद्दल तुम्हाला कोणता खेदही नसेल पण आता तुम्ही स्थिरतेच्या शोधात असाल ? कोणता आधार शोधत असाल ? तर सिंगलपासून मिंगल होण्याची ही योग्य वेळ असल्याचं समजावं. याबाबत तुम्ही गंभीर असाल तर लग्न करायला हवं.
पैशांची बचत
सिंगल असताना आपण सारी कमाई खर्च करुन टाकतो. आपण बऱ्याचदा वर्तमानात जगत असतो. पण अशी एक वेळ येते जेव्हा आपण बचतीबद्दल विचार करतो, घर घेण्याबद्दल विचार करतो. ही लग्नाची योग्य वेळ असू शकते.
प्रेमात असताना
सिंगल लाईफमधून बोअर होणं हा मानवी स्वभाव आहे. आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टी कोणासोबत तरी शेअर कराव्या असं अनेकांना वाटतं. कधीतरी आपण खऱ्या प्रेमात पडतो. टीन एज संपल्यानंतर २४ ते २८ वर्षाचे असताना तुम्ही कोणावर प्रेम करत आहात आणि समोरची व्यक्तीही तुमच्यावर तेवढंच प्रेम करत असेल तर ही लग्नाची योग्य वेळ आहे.
डेट करताय
प्रेम नवं नवं असताना आपल्या पार्टनरसोबत प्रत्येक विकेंडला डेटवर जाणं अनेकांना आवडत. एकाच व्यक्तीसोबत हे वारंवार होतंय आणि तुम्हाला ती व्यक्ती खूपच आवडत असेल तर हे लग्नाचे शुभ संकेत असल्याचे तुम्ही मानू शकता.
फ्रेंड सर्कलमध्ये कंफर्ट
बऱ्याच जणांना आपल्या पार्टनरच्या फ्रेंड सर्कलसोबत फिरायला संकोच वाटतो. पण लग्नापर्यंत मनं जुळली असतील तर आपल्याला पार्टनरच्या फ्रेंडसोबतही कंफर्ट वाटू लागतं. आपल्याला कपल लाईफ बद्दल खूप काही जाणून घ्यायचं असतं म्हणून बऱ्याचदा हे होतं. हादेखील तुमच्या लग्नाचा एक संकेत असू शकतो.