Benefits Of Hugs : आवडत्या अथवा प्रिय व्यक्तीला मिठीत घेतले की सगळे टेन्शन दूर झाल्यासारखे वाटते. आई -वडिल, बहिण- भाऊ, मित्र-मैत्रीण यांची मिठी म्हणजे मोठा आधार वाटते. तर, जोडीदाराला मारलेली मिठी आश्वासक आणि प्रेमाचं नात अधिक घट्ट करणारी वाटते. एकूणच काय मिठी म्हणजे मानवी भावना व्यक्त करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. मात्र, वैज्ञानिक दृष्ट्या देखील मिठी घेण्याचे जबरदस्त फायदे(Benefits Of Hugs ) आहे.  जवळच्या व्यक्तीला 20 सेकंद पर्यंत मिठीत घेतल्यास तुम्ही सगळ्या प्रोब्लेममधून टेन्शन मुक्त व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता संजय दत्त याने त्याच्या मुन्नाभाई MMBS या चित्रपटात जादूकी झप्पी अर्थात मिठी मारुन सगळ्यांना टेन्शनमुक्त करते. अशाच प्रकारे प्रत्यक्षात देखील मुन्नाभाईची ही जादू की झप्पी काम करते. 


मिठी मारल्याने शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात. ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन अशी या हॅप्पी हार्मोन्सची नावे आहेत. या प्रत्येक हार्मोनचा मानवाच्या शारिरावर आणि मेंदूवर वेगवेगळा प्रभाव होता.


ऑक्सिटोसिन


या हार्मोनला प्रेम संप्रेरक म्हणून ओळखले जाते. हे हार्मोन तणाव कमी करण्यास मदत करतात. या हार्मोमुळे  हृदय चांगले राहते.


डोपामाइन


हा हार्मोन मानवी शरीरात एक रासायनिक संदेशवाहक म्हणून काम करतो. हा हार्मोन आपल्या मेंदूला अनेक चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो. शरीरात जेव्हा मोठ्या प्रमाणात डोपामाइन रसायन बाहेर पडते तेव्हा आनंद आणि शांती सारख्या अनेक


सकारात्मक भावना निर्माण होतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीला आत्म-समाधान मिळते.


सेरोटोनिन


सेरोटोनिन हार्मोन आपल्या तणावावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. यामुळे आपला मूड चांगला राहतो. एकाकीपणाची भावना कमी होते.


मिठी मारण्याचे हे फायदे 


  • मिठी मारल्याने तणाव कमी होतो आणि मूड चांगला होतो.

  • मिठी मारल्याने हृदयाचे ठोके सामान्य होतात. 

  • 10 मिनिटे हात धरून ठेवण्यापासून ते 20 सेकंदांपर्यंत मिठी मारल्यास बीपी नॉर्मल होण्यास मदत होते.

  • जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने तुमची भीतीची भावना नाहीशी होते.

  • चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी मिठी मारणे फायद्याचे आहे.

  • जेव्हा तुम्हाला खूप आत्मविश्वासाची गरज असते. अशा वेळेस तुमच्या जोडीदाराला मिठी माराय यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.