Emotional Affair Impact On Marriage : आपल्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, ज्यावेळी आपल्याला एका जोडीदाराची गरज असते. अशा परिस्थितीत प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी एक साथीदार आवश्यक असतो. मात्र काहीवेळा लोक त्यांच्या गरजांमुळे संबंध खराब करतात. जीवनाचा आनंद घेण्यासाठी ते दुसऱ्या व्यक्तीशी भावनिकरित्या संबंध जोडू लागतात. हे इमोशनल अफेयरचं ( Emotional Affair ) कारण बनतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही म्हणाल की इमोशनल अफेयर ( Emotional Affair ) चुकीचं आहे का? जर तुम्ही सिंगल असाल किंवा कोणाशीही कमिटेड नसाल तर इमोशनल अफेयर जोडणं चुकीचं मानलं जात नाही. पण जर तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुम्ही इमोशनल अफेयर ( Emotional Affair Impact On Marriage ) जोडण्याचा विचार कराल तर ते चूक आहे. यावेळी दुसऱ्या व्यक्तीमुळे तुम्ही तुमचे नाते बिघडवता, जे वैवाहिक जीवनात फसवणूक करण्यासारखे आहे


इमोशनल अफेयर म्हणजे काय?


इमोशनल अफेयर ( Emotional Affair ) मध्ये एखाद्या व्यक्तीच्या भावना एखाद्या व्यक्तीशी जोडू लागतात. हे त्यावेळी होऊ लागतं जेव्हा ते त्या व्यक्तीसोबत असतात किंवा जवळ असतात. यावेळी त्या संबंधित व्यक्तीला अधिकाधिक वेळ द्यायला आवडू लागतं. इमोशनल अफेयरमध्ये ( Emotional Affair ) एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध जोडणे आवश्यक नसते. यामध्ये व्यक्ती समोरच्याशी भावनिक नातं जोडून त्याला आपल्या दिनचर्येचा एका भाग बनवते. 


वैवाहिक जीवनावर याचा काय परिणाम होतो?


कोणत्याही व्यक्तीशी भावनिक संबंध जोडणं अजिबात चुकीचं नसलं तरीही तुम्ही आधीच नात्यात बांधले असाल तर तुमच्या जोडीदाराला याची माहिती असणं आवश्यक आहे. भावनिक नातं जोडल्यानंतर लोक आपल्या जोडीदाराचा कंटाळा करू लागतात. ते समोरच्या दुसऱ्या व्यक्तीला अधिकाधिक वेळ देऊ लागतात. ज्यामुळे जोडप्यांमध्ये अंतर निर्माण होऊ लागतं. या गोष्टी एखाद्या नात्यातील एखाद्याला फसवण्यासारख्या आहेत.


इमोशनल अफेयरमध्ये आहोत हे कसं ओळखावं?


एकट्याने वेळ घालवण्याची कारणं शोधता - जर एखादी व्यक्ती इमोशनल अफेयरमध्ये अडकली असेल तर तो अधिकाधिक वेळ एकट्याने घालवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो समोरच्या व्यक्तीला जास्त वेळ देऊ शकत नाही. 


पार्टनरपेक्षा समोरच्या व्यक्तीचा विचार- एखादी व्यक्ती इमोशनल अफेयरमध्ये इतकी गुंतते की, आपल्या रिलेशनशिपच्या प्रत्येक बाबतीत जोडीदारापेक्षा समोरच्या व्यक्तीचा विचार अधिक वेळा डोक्यात येतो.