मुंबई : अनेकदा असं होतं की आपण एखाद्या गोष्टीवर बोलत असतो मात्र त्याचे रुपांतर भांडणात होतं. अनेकदा आपण समोरच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतो त्यामुळे गैरसमज होतो आणि भांडण होते. भांडणामुळे नात्यात दुरावा येतो. अनेकदा हा दुरावा इतका वाढतो की त्याचे पर्यवसन नाते संपुष्टात येण्यापर्यंत होते. अशी भांडणे होण्यापासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवस असो रात्र अशी एक वेळ बोलण्यासाठी निवडा ज्यावेळेस तुमच्या दोघांच्या डोक्यात तसेच मनात कोणतेही विचार सुरु नसतील. त्यामुळे तुम्ही एकमेकांशी बोलू शकाल. 


बोलत असताना समोरच्याला त्याचे बोलणे पूर्ण करु द्या. अनेकदा आपण समोरच्याचे संपूर्ण ऐकून न घेता रिअॅक्ट होतो जे चुकीचे आहे. समोरच्याचे बोलणे संपूर्ण ऐकल्याशिवाय रिअॅक्ट होऊ नका.


अनेकदा रागात आपण बोलत असताना मध्येच उठून जातो जे योग्य नाही. यामुळे प्रॉब्लेम संपत नाही तर वाढतोच. कोणत्याही मुद्दयावर बोलत असाल तर तो मुद्दा पूर्ण करा.


जोडीदारांमध्ये झालेले भांडण ही काही लढाई नव्हे ज्यात कोणाचातरी विजय झालाच पाहिजे. त्यामुळे एकमेकांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा समजून घेण्याचा विचार करा.


तुम्हाला जे काही सांगायचे वा बोलायचे आहे ते सरळ आणि स्पष्टपणे बोला. फिरून फिरुन बोलण्यात काहीच अर्थ नसतो.