मुंबई : पती-पत्नीचे नातं हे एका कच्च्या धाग्याप्रमाणे असतं. याला जराही धक्का बसला तरीही मोठा फरक पडतो. या नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. आजच्या काळात पती-पत्नीमध्ये जर काही अंतर असेल तर परिस्थिती घटस्फोटापर्यंत पोहोचते. या नात्यात थोडीशी कटुता आली तर पती-पत्नी एकत्र राहत असतानाही वेगळे राहतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पती-पत्नीच्या नात्यात दरी निर्माण होण्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे संशय. शंका ही संबंध तोडण्याची पहिली पायरी आहे. आज आम्ही तुम्हाला 3 कारणं सांगणार आहोत ज्यामुळे पती पत्नीवर संशय घेऊ लागतो.


मोबाईलमुळे नात्यात येतो दुरावा


जर एखादी महिला तिच्या पतीपेक्षा मोबाईलसोबत जास्त वेळ घालवत असेल तर इथे संशयाला वाव आहे. पुरुषांचं म्हणणे आहे की, जर त्यांची पत्नी शांतपणे मोबाईलवर जास्त वेळ घालवत असेल तर त्यांच्या मनात शंका निर्माण होते. बायको मोबाईलवर आपलं काम करत असेल किंवा गेम खेळत असेल किंवा मालिका बघत असेल, पण नवऱ्याच्या आत संशयाचं बीज रुजायला लागतं. अशा परिस्थितीत शंकेची व्याप्ती आणखी वाढेल, पतीने याबाबत पत्नीशी बोलणं योग्य ठरेल.


नवऱ्याला जास्त वेळ देत नसेल तर


जर पत्नी इतरांशी जास्त बोलते, परंतु तिच्या पतीपेक्षा कमी असते, तर ही एक मोठी समस्या असू शकते. पत्नीची ही सवय पतीच्या मनात शंका निर्माण करते. पतीला वाटू लागतं की, आपल्या बायकोला त्याच्याबद्दल आकर्षण नाही. पुरुष हे कोणाशीही शेअर करत नाहीत. ते त्यांच्या मनात विचार करतात आणि त्यांच्या शंका अधिक गडद होतात. अशा परिस्थितीत पतीने याबाबत थेट पत्नीशी बोलले पाहिजे. जेणेकरून नात्यात अंतर राहणार नाही.


पत्नीच्या तोंडून दुसऱ्या मुलाची स्तुती 


बहुतेक पुरुषांना त्यांची पत्नी इतर मुलांशी जास्त बोलते हे आवडत नाही. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागते. अशा स्थितीत पत्नीने एखाद्या मुलाची स्तुती केली तर पुरुषाच्या मनात संशय निर्माण होतो. यावरून पती-पत्नीमध्ये हळूहळू वाद होऊन नंतर  होण्याची परिस्थिती निर्माण होते.