Relationship Tips : आता लग्न करणं जितकं कठीण आहे त्याच्यापेक्षा ते आयुष्यभर टिकवून ठेवणं हे जास्त अवघड झालं आहे. अगदी थोड्याशा चुकीने किंवा गैरसमजामुळे सात जन्माची साथ देण्याचं दिलेलं वचन तुटू शकतं. त्यामुळे पती-पत्नीने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचललं पाहिजे. जर हे नाते दीर्घकाळ टिकवायचं असेल तर विवाहित जोडप्याने एकमेकांना 5 वचने द्यावीत आणि ती पूर्ण करावीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये काहीही खाजगी राहत नाही, परंतु असं असलं तरी प्रत्येक व्यक्तीची खाजगी जागा असते. एक मर्यादा आहे जी कधीही दोघांपैकी एकानेही ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पती किंवा पत्नीच्या काही गोष्टी वैयक्तिक असू शकतात, जसे की मित्रांची काही गुपित, आई-वडील किंवा भावंडांसोबतची नाती. तुम्ही विनाकारण त्यांच्या नात्यामध्ये अडथळा बनण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर त्यामुळे तुमच्या दोघांमधील संबंध बिघडू शकतात.


जगाच्या नजरेत तुमच्या लाइफ पार्टनरच्या प्रोफेशनला काही विशेष महत्त्व नसेल, पण त्यामुळे तुम्ही त्यांची खिल्ली उडवू शकत नाही. कोणतेही काम छोटं समजणं ही मोठी चूक आहे. लग्नानंतर तुमच्या जोडीदाराच्या कामाला कमी लेखू नका. 


तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराचे शब्द अनावश्यक वाटले तरी तुम्ही त्यांचं बोलणं ऐकणं महत्वाचे आहे. जेणेकरून पार्टनरला याची जाणीव होईल आपल्या काळजी घेण्यासाठी हक्काचं कोणीतरी आहे. 


प्रत्येकाला आशा असते की लग्न झाल्यावर आपली राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जीवन साथीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळायला हवं. जर तुम्ही त्यांना आर्थिक मदत करू शकत नसाल तर किमान त्यांना मानसिक आधार द्या. 


आजकाल धावपळीमध्ये सर्वजण खूप व्यस्त झाले आहेत. करिअरच्या मागे धावताना आपल्या पार्टनरला आपण पुरेसा वेळ देत नाही. त्यामुळे तुम्हाला जितका वेळ मिळेल तो तुमच्या पार्टनरसोबत घालवा.