Bridal Mehndi Facts: भारतीय संस्कृतीत लग्नात वधू दोन्ही हाता-पायावर मेहंदी लावलेली दिसते. अनेक ठिकाणी तर मेहंदीचा विशेष सोहळा आयोजित केला जातो. हातापासून पायापर्यंत मेहंदी लावल्यानंतर वधू आणखी सुंदर दिसते. तिच्यासोबतच्या करवल्यादेखील आपली हौस फिटवून घेतात. म्हणूनच लग्न समारंभात वधूच्या मेहंदी सोहळा महत्वाचा मानला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेहंदीची परंपरा संस्कृतीशी जोडलेली असली तरी त्याला शास्त्रीय कारणेही आहेत. वधूला मेंदी लावण्यासाठी हातावर आणि पायावर वेगवेगळ्या सुंदर रचना केल्या जातात. नववधूंना सर्वत्र मेहंदी लावली जाते, पण ती का लावली जाते? हे ९९ टक्के लोकांना माहिती नाही. 


धार्मिक आणि सामाजिक परंपरा


लग्नात वधू आणि महिलांनी मेहेंदी लावणे याला धार्मिक आणि सामाजिक परंपरेशी जोडले जाते. धार्मिकदृष्ट्या मेहंदीला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या 16 अलंकारांचा उल्लेख आहे. यामध्ये मेहंदी लावण्याचा देखील समावेश आहे.


मेहंदीमुळे वधूचे सौंदर्य आणखी खुलते. नवरीला लावलेल्या मेहंदीचा रंग जितका गडद असेल तितका तिचा जोडीदार तिच्यावर जास्त प्रेम करतो आणि त्यांची जोडी अधिक सुसंगत असते,असं म्हटलं जातं. मेहंदीचा हा गडद रंग वधू आणि वर दोघांनाही जोडून दिसतो.


मेहंदीमागचे वैज्ञानिक कारण


हिंदू धर्मात परंपरेनुसार वधू-वरांनी मेहंदी लावली जाते. परंतु त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. मेहंदी ही मूळता थंड आहे. लग्नाच्या वेळी अनेकदा वधू-वर तणावाखाली असतात.  यामुळे हात-पायांवर मेंदी लावल्याने शरीराचे तापमान थंड राहते.


याशिवाय आयुर्वेदिक औषधातही मेहंदीचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे लोक फक्त उन्हाळ्यातच डोक्यावर मेंदी लावतात,हिवाळ्यात मेहंदी लावणं टाळलं जातं. यामागेही मेंहदीचे थंड असणे कारणीभूत आहे.